एक्स्प्लोर
Nashik Fire : इगतपुरी आग दुर्घटना; नाशिक-मुंबई वाहतूक खोळंबली, वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न
इगतपुरी मुंढेगाव जवळ झालेल्या जिंदाल कंपनीतील स्फोटानंतर तातडीने नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक प्रशासनाने पूर्ण थांबवली आहे.
Maharashtra Nashik igatpuri Fire : इगतपुरी मुंढेगावजवळ झालेल्या जिंदाल कंपनीतील स्फोटानंतर तातडीने नाशिक मुंबई महामार्गावरील (Nashik Mumbai News) वाहतूक प्रशासनाने पूर्ण थांबवली आहे. त्यामुळे नाशिक मुंबई महामार्गावरील दोन्हीकडे वाहतुकीची कोंडी झाली झाल्याने ही कोंडी सोडवण्याचे काम सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. दरम्यान या स्फोटानंतर नाशिकच्या प्रशासकीय अधिकारी तातडीने दाखल झाले असून आमदार हिरामण खोसकर, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह इतर अधिकारी घटना सगळे घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील थोड्याच वेळात घटनास्थळावर पोहोचत आहेत.
दरम्यान या भीषण स्फोटात आतापर्यत 12 जखमी रुग्णांना नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चार जण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचे समजते आहे. प्रशासनाच्या वतीने गंभीर जखमींना बाहेर काढून त्यातील काही जखमींना इगतपुरीला तर काहींना नाशिकला पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे नाशिक-मुंबई महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आल्याचे समजते. मात्र यामुळे नाशिक आणि मुंबई महामार्गावर दोन्ही कडील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तर कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा परिवारातील सदस्य देखील या ठिकाणी येत असल्याने कंपनीच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री घटनास्थळी रवाना ..
दरम्यान या घटनेची माहिती समजतात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इगतपुरीला रवाना झाले आहेत. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात या घटनेनंतर इमर्जन्सी कक्ष तयार करण्यात आला आहे. जखमीमध्ये गणेश यादव, हिरामण यादव, मोहन पवित्रा सर्जित कुमार, कैलास कुमार श्यामसुंदर यादव, गोस्वामी श्रद्धा, कतयार याचिका, पूजा सिंह, तालीम अबू पाठक, मनोज लखन सिंह, गजेंद्र सिंह अशी जखमींची नावे आहेत.
आज सकाळची घटना...
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिंदाल पॉलिसीम कारखान्यात आज सकाळी साडेअकरा वाजता सुमारास मोठा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीचे रौद्ररूप धारण केले असून इगतपुरी तालुक्याच्या विविध भागात आगीचे लोळ दिसत आहेत. दरम्यान या घटनेत मोठ्या संख्येने जीवित हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून सर्व स्तरावरून बचाव कार्य सुरू आहे.
ही बातमी देखील वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement