एक्स्प्लोर

भाऊबीजेला गालबोट, गोदाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी आणि भाचीवर काळाचा घाला 

Nashik Diwali Bhaubeej : भाऊबीजेला गालबोट लागले असून माहेराला गेलेल्या दोघा महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Nashik Diwali Bhaubeej : भाऊबीजेला गालबोट लागले असून माहेराला गेलेल्या दोघा महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐन भाऊबीजीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे.

यंदा मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा होत आहे. आज भाऊबीज म्हणजे बहीण भावाचा दिवस. भाऊबीजेच्या निमित्ताने माहेरी महिला वर्गाची लगबग सुरू आहे. अशातच नाशिकहून कोपरगाव या ठिकाणी भाऊबीजेला गेलेल्या विवाहितेसह भाचिचा कपडे धुवत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव वारी येथे ही घटना घडली आहे.  भाऊबीजी निमित्त भावाकडे आलेल्या बहिणीचा व दुसऱ्या बहिणीच्या मुलीचा गोदावरी नदीवर धुणे धुत असतांना मुलाचा पाय घसरून पडल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अर्चना जगदीश सोनवणे रा. वणी नाशिक व कु. राणी शरद शिंदे रा. म्हसरूळ नाशिक असे मयत झालेल्या महिलांचे नावे आहे. 

दरम्यान भाऊबीज निमित्त कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे मंगेश माणिकराव चव्हाण या भावाकडे 3 बहिणी तसेच भाचा-भाच्या आल्या होत्या. त्या आज सकाळी भाऊबीज आटोपून घरानजीक असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास धुणे धुण्यासाठी गेल्या. अर्चना सोनवणे यांचा मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने काठावरून पाय घसरून पडल्याने त्याला वाचविण्यासाठी आई पाण्यात गेली.

दरम्यान त्यापाठोपाठ त्यांच्या तीन भाच्यांनी त्यांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली असे एकूण पाच जण नदीत बुडत असतांना अवघ्या चौदा वर्षीय मामाचा मुलगा मंगेश याने तीन जणांना वाचविले. मात्र आत्या व दुसऱ्या आत्याच्या मुलीला तो वाचवू शकला नसल्याची माहिती उपस्थित नातेवाईकांनी दिली आहे. सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

गोदाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी आणि भाचीवर काळाचा घाला 

दिवाळीनिमित्त भाऊबीजेची सर्वत्र धामधूम सुरू असताना कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात गोदावरी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी आणि भाचीवर काळाने  घाला घातला आहे. गोदावरी नदीच्या पाणीपत्रात बुडून मावशी आणि भाचीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अर्चना जगदीश सोनवणे (वय ३५ राहणार नाशिक) आणि गौरी शरद शिंदे (वय १८ रा. मसरुळ नाशिक) असे मृत्यु झालेल्या मावशी व भाचीचे नाव आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget