Nashik Dam Position नाशिक : जिल्ह्यातील भावली धरण (Bhavali Dam) ओव्हरप्लो झाले झाले असून कडवा धरण (Kadwa Dham), दारणा धरण (Darna Dam) 87.09, नांदुरमध्यमेश्वर 93 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाने (Nashik Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे काही धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. मात्र नाशिक शहरवासियांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षाच कायम आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणातील (Gangapur Dam) पाणीसाठा 59.48 टक्के साठा झाला आहे. जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानंतर आता कुठे काही धरणात पाणीसाठा वाढतो आहे. पण, तरी काही धरणाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. गंगापूर धरण समुहात 51.20 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 389.8 मिली लिटर म्हणजेच 84.1 टक्के एवढा पाऊस झाला आहे तर नाशिक विभागात एकूण 372.8 मिली लिटर म्हणजेच 108.3 टक्के एवढा पाऊस नोंदवण्यात आला आहे.
धरण | आजचा साठा | मागील वर्षीचा साठा |
गंगापूर (Gangapur Dam) | 59.48 | 73.57 |
कश्यपी (Kashyapi Dam) | 40.17 | 29.75 |
वाघाड (Waghad Dam) | 44.14 | 31.27 |
दारणा (Darna Dam) | 78.14 | 84.26 |
भावली (Bhaval Dami) | 100 | 100 |
गिरणा (Girna Dam) | 27.50 | 13.40 |
मुकणे (Mukne Dam) | 64.65 | 33.50 |
पालखेड (Palkhed Dam) | 50.38 | 41.35 |
कडवा (kadwa Dam) | 72.99 | 87.09 |
करंजवण (Karanjvan Dam) | 38.63 | 20.13 |
चणकापूर (Chankapur Dam) | 47.63 | 31.48 |
ओझरखेड (Ozarkhed Dam) | 27.00 | 0.00 |
वालदेवी (Waldevi Dam) | 39.89 | 66.37 |
भोजपुर (Bhojpur Dam) | 32.13 | 40.44 |
नांदूर मध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar Dam) | 54.47- | 93.00 |
नाशिक जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी
दरम्यान, इगतपुरीत 811.6 मिली (51.8 टक्के), नाशिक223.1 मिली (61.8 टक्के), पेठ 722.9 मिली (72.8 टक्के), सुरगाणा 722.7 मिली (76.0 टक्के), कळवण 246.8 मिली (80.2 टक्के), त्र्यंबकेश्वर 1144.4 मिली (100.2 टक्के), सिन्नर 285.8 मिली (114.5 टक्के), बागलाण 276.5 मिली (119.1 टक्के), मालेगाव 286 मिली (128.5 टक्के ), दिंडोरी 427.5 मिली (129 टक्के), निफाड 249 मिली (123 टक्के), नांदगावमध्ये 285.8 मिली (126.5 टक्के), येवला 283 मिली (130 टक्के), चांदवड 358 मिली (139 टक्के), देवळा 303.7 मिली (156 टक्के) इतका पाऊस बरसला आहे.
नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम
दरम्यान, सर्वांत कमी पाऊस नाशिक आणि इगतपुरी या ठिकाणी नोंदविण्यात आला आहे. या तालुक्यातील पावसाने सरासरीही गाठली नसल्याने या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेठ, सुरगाणा, कळवण या भागातही पावसाने पावसाचे प्रमाण कमी असंल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
इतर महत्वाच्या बातम्या