Nashik Crime News नाशिक : शहरात दिवसेंदिवस घरफोडीच्या (Robbery) घटनांमध्ये वाढ होत आहे. घरफोडी रोखणे नाशिक पोलिसांपुढे (Nashik Police) मोठे आव्हान असून पुन्हा एकदा शहरात तीन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यात चोरांनी सुमारे पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
यात दोन घरफोड्या भरदिवसा झालेल्या आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीतील केवल पार्क मार्ग, रविवार कारंजा आणि सातपूर परिसरात या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी सरकारवाडा, सातपूर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
95 हजारांचे अलंकार चोरीला
पहिली घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील केवल पार्क मार्गावर घडली आहे. याबाबत ओमकार कुलकर्णी यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडून कपाटातील सुमारे 95 हजाराचे अलंकार चोरून नेले आहेत. याबाबत ओमकार विनायकराव कुलकर्णी (रा.जाधव पार्क,सातपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.
बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी
दुसरी घटना रविवार कारंजा भागात घडली आहे. कोरडे कुटुंबीय २२ ते २६ जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व घड्याळ असा सुमारे २१ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. संदिप शिवाजी कोरडे (रा. ग्यानू पागा लेन,एकमुखी दत्त मंदिराजवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार अहिरे करीत आहेत.
भरदिवसा दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
तिसरी घटना लहवित येथे घडली आहे. शिंगोटे परिवार कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ५२ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे लंपास केले. अंबड गावठाण भागात राहणाऱ्या सचिन रामकृष्ण शिंगोटे यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पाचोरे करीत आहेत.
आणखी वाचा
Nashik Crime News : जबरी जोरी करणारे सराईत पोलिसांच्या ताब्यात; सात मोबाईलसह एक दुचाकी जप्त