Nashik Crime News नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षाची ऑडियो क्लिप (Audio clip) काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या (Saint Nivrittinath Maharaj) समाधीची औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीशी तुलना केल्याचा उल्लेख या क्लिपमध्ये आढळल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Group) पदाधिकाऱ्याला हे चांगलेच अंगलट आले आहे.
किरण चौधरी (Kiran Chaudhari) असे त्याचे नाव आहे. चौधरी हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे (Navnath Kothule) यांच्या तक्रारीनुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
काही दिवसांपूर्वी किरण चौधरी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात औरंगजेबाची समाधी पाहण्यासाठी गेला. त्यानंतर तो त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) आला असता त्याने एका मित्राला कॉल केला. त्यात त्याने खुलताबादला (Khultabad) भेट दिल्याचे सांगितले. औरंगजेबाची कबर पाहून खूश झाल्याचे तो यावेळी म्हणाला. संत निवृत्तीनाथांच्या समाधी आणि औरंगजेबाच्या कबरीची रचना सारखीच असल्याचे त्याने यावेळी म्हटले. विशेष म्हणजे याच मित्राने ती ऑडीओ क्लिप व्हायरल केली होती.
चौधरीला पोलिसांनी घेतले ताब्यात
हा मुद्दा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. चौधरी विरोधात कारवाई करण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Police) मनसेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे यांच्या तक्रारीनुसार चौधरीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच त्याला ताब्यात देखील घेतले आहे. आज त्याला न्यायालयात (Court) हजर केले जाणार आहे.
गृहविभागाने सखोल चौकशी करावी
छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाची तुलना किरण चौधरी याने आमच्या देवदेवतांशी केली. हिंदू धर्मियांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही संपूर्ण हिंदू धर्मियांच्या वतीने किरण चौधरी विरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. या लोकांची गृहविभागाने सखोल चौकशी करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे (Navnath Kothule) यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या