Nashik Crime News नाशिक : सिमेन्स कंपनी, एमआयडीसी अंबड येथे एक वर्षापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना (MIDC Police) यश आले आहे. त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चुंचाळे पोलिसांची (Nashik Police) नववर्षातली ही पहिली दमदार कामगिरी आहे.
याबाबत मिळालेल्या महिनुसार, सिमेन्स कंपनी, एमआयडीसी अंबड (Ambad) येथे एक वर्षापूर्वी चोरी केलेल्या संशयित आरोपीची पोलीस शिपाई सुर्यवंशी यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक पाडेकर, पोशि सुर्यवंशी, पोना समाधान चव्हाण, पोशि जाधव, कांदळकर, गेहे, कुऱ्हाडे, ढाकणे यांची टीम तयार करण्यात आली.
मुद्देमाल भंगार दुकानदारांना विकला
पोलीस पथकाने संशयित आरोपीस ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस कोठडीत असताना त्याने त्याच्या इतर साथिदारामार्फत गुन्हा केल्याचे सांगितले. साथिदारांचा शोध घेवून त्यांना अटक केली असता त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल भंगार दुकानदारांना विकल्याचे सांगितले.
39 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
भंगार दुकानदारांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेला 22 लाखांचे कॉपर, 5 लाखांचा जेसीबी, 6 लाखांची बोलेरो पिकअप, 6 लाखांच्या दोन चारचाकी, 15 हजारांची बाईक, 4 हजारांचे कटर मशीन, 6 हजार रुपयांची व्हिल बॅरो, असा एकूण 39 लाख 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
किरकोळ कारणावरून कुरापत काढून दाम्पत्यास मारहाण
तिडके कॉलनीतील मिलिंदनगरात किरकोळ कारणातून टोळक्याने दाम्पत्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी सळई, लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने पती जखमी झाला आहे. तर पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले आहे. याबाबत समाधान साबळे (३५, मिलिंदनगर, तिडके कॉलनी) यांनी तक्रार दिली. विशाल जाधव, बाबू गायकवाड, ऋषिकेश अंबारे व अन्य साथीदार (रा. मिलिंदनगर) अशी दाम्पत्यास मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. संशयित टोळक्याने किरकोळ कारणावरून कुरापत काढून दाम्पत्यास शिवीगाळ व दमदाटी करुन मारहाण केली.
महिलेचे मंगळसूत्र लंपास
एसटीने प्रवास करणाऱ्या ठाणे येथील महिलेच्या पिशवीतील ६५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना महामार्ग बसस्थानकात घडली. याबाबत नाना मोरे (वांगणी, अंबरनाथ, ठाणे) यांनी तक्रार दिली. मोरे दाम्पत्य रविवारी दुपारी परतीच्या प्रवासासाठी महामार्ग बस स्थानकात आले होते. ठाणे बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी मोरे यांच्या पत्नीच्या हातातील पिशवीची चेन उघडून मंगळसूत्र चोरले. बसमध्ये बसल्यानंतर ही बाब लक्षात येताच मोरे दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या