मनमाड : विमा प्रतिनिधीनेचा ठेवीदारांना करोडोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील (Nashik News) मनमाड येथे घडला आहे. युनियन बँकेत (Union Bank) हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मनमाडमध्ये (Manmad) मोठी खळबळ उडाली असून ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, युनियन बँक मनमाड शाखेतील विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी, नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार समोर आल्याने बँकेच्या मुदत  ठेवीदारांचे चांगले दाबे दाणाणले आहेत. 


विमा प्रतिनिधीकडून करोडोंचा अपहार


संतप्त ठेवीदाराने बँकेसमोर एकच गर्दी केली. सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) असे अपहार करणाऱ्या विमा प्रतिनिधीचे नाव असून त्याने शेकडो मुदत ठेवीदारांकडून बँकेच्या मुदत ठेवी करण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी बेअरर चेक घेतले व  स्वतःच्या नावावर परस्पर वटवून करोडो रुपयांचा अपहार केल्याचे ठेवीदारांचा आरोप आहे. 


ठेवीदारांना पैसे परत देण्याची हमी


अपहाराची व्याप्ती पाहता बँकेने तातडीने चार जणांची चौकशी पथक नेमले असून त्यांच्या मार्फत या गैरव्यवहाराची चौकशी सुरु केली असून, ठेवीदारांना पैसे परत देण्याची हमी दिली जात आहे.बँकेमार्फत संबंधित विमा प्रतिनिधी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे काम सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune Ink Attack: मोठी बातमी: कोर्टाबाहेर भावनांचा उद्रेक, विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न, वातावरण तापलं


मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणी कोर्टात धनिकपुत्राच्या वकिलांनी काय सांगितलं, वाचा स्टार्ट टू एन्ड युक्तिवाद