Nashik Crime News नाशिक : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या (New Year 2024) पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नाशिक शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. फिक्स पॉईन्ट, नाकाबंदी व पेट्रोलिंगद्वारे टवाळखोरांवर नाशिक पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. शहरात एकूण ८०३ जणांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाणे हद्दीत ६५ ठिकाणी फिक्स पॉईन्ट बंदोबस्त, ३० ठिकाणी नाकाबंदी पॉईन्टचे आयोजन करण्यात आले होते.त्याच प्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यात ५ वाहने पेट्रोलिंगकरिता अशी एकूण ६५ वाहने गस्तीसाठी तैनात होती. याअंतर्गत ३१ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाई केली.
४४५ जणांविरोधात कारवाई
आडगांव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापूर असे परिमंडळ -१ कार्यक्षेत्रात १५१ टवाळ खोर व ६३ रेकॉर्डवरील गुन्हेगार.
अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, एमआयडीसी चुचांळे असे परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात १६३ टवाळखारे व ६८ रेकॉर्डवरील गुन्हेगार असे एकूण ४४५ इसमांविरुध्द कारवाई करण्यात आली.
मोटार वाहन कायदा कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध झालेली कारवाई
हेलमेट : 189
सिट बेल्ट : 24
ट्रिपल सिट : 47
ब्लॅक फिल्म : 03
नो एंन्ट्री : 13
सिग्नल जंप : 24
नो पार्किंग : 09
इतर : 35
एकूण केसेस : 336
एकूण दंड : 1 लाख 95 हजार 250
तसेच मद्यपान करुन वाहन चालवून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २२ इसमांविरुध्द मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त ऍक्शन मोडवर
दरम्यान, नाशिकच्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे सध्या ऍक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळत आहेत. थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरले होते.गंगापूर रोड, कॉलेज रोड परिसरात अनेक वाहनांची तपासणीही कर्णिक यांनी केली. पहाटेपर्यंत पोलीस आयुक्तांचा ताफा शहरभर फिरत होता. नाशिककरांना नववर्षाच्या शुभेच्छा देतांनाच महिला सुरक्षा, ड्रग्स विरोधी कठोर कारवाई आणि वाहतुकीला शिस्त हे तीन संकल्प नाशिक पोलिसांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
असा होता पोलिसांचा फौजफाटा
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहा सहाय्यक पोलीस आयुक्त, 59 पोलीस निरीक्षक, 92 सहा. पोलीस निरीक्षक/पोउनि, 884 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या