Nashik News नाशिक : शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे (JN.1 Coronavirus) तीन रुग्ण आढळून आले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे रुग्ण आढळल्याने मनपा आरोग्य विभाग (NMC Health Department) सतर्क झाला आहे. एका रुग्णावर खासगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु असून दोन रुग्णांना होम क्वारंटाईन (Home Quarantine) करण्यात आले आहे.


ग्रामीण भागापाठोपाठ आता नाशिक (Nashik) शहरात देखील कोरोनाची एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली आहे. 2 महिला रुग्ण असून एका तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर एक पुरुष आणि एका महिलेला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 


मनपा अलर्ट मोडवर


महापालिकेतर्फे कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेतली जात आहे. गेल्या २४ डिसेंरबरपासून शहरातील मनपाच्या रुग्णालयांमध्ये रॅपिड अँटिजन टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नाशिरोडच्या जेडीसी बिटको रूग्णालय, स्वामी समर्थ रूग्णालय, सिडकोच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचण्या केल्या जात आहे. 


२०० जणांच्या चाचण्या निगेटिव्ह


आतापर्यंत सुमारे २०० जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मात्र रविवारी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही विशेष खबरदारी घेत शहरात सुमारे ४०० बेडसह ऑक्सिजन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 


सिन्नर, त्र्यंबकेश्वरमध्ये आढळले होते कोरोनाबाधित रुग्ण


सिन्नर तालुक्यात कोरोनाचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत.शहरातील एक ६० वर्षाची व्यक्ती आणि सुरेगाव येथील ३६ वर्षाची महिला हे संशयित रुग्ण आहेत. दोघांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत.


तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिला ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झाली होती. सर्दी जाणवत असल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी तिची आरटीपीसीआर चाचणी केली होती. या चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात संबंधित महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. 


नागरिकांनी सतर्कता बाळगावी


कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा धोका लक्षात घेता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना आजार आहेत त्यांना या न्यू व्हेरिएंटचा धोका अधिक असल्याने त्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्कता बाळगावी, असे आवाहन नाशिक महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Trimbakeshwar News : नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्र्यंबकला मोठी गर्दी; दोन किमीपर्यंत रांगा, सोयीसुविधांअभावी भाविक नाराज


Nashik News : नाशकात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट, दोन गंभीर; २०२३ साली आजच्याच दिवशी घडलेल्या जिंदाल दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या