Nashik Crime News नाशिक : तुमच्या मोबाईलवरुन मनी लाँड्रिंगचे (Money laundering) व्यवहार झाले आहेत. मुंबई क्राईम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) हाती याबाबतचे पुरावे लागले असून, यातून सुटका करून घ्यायची असेल तर, आम्ही सांगू त्या बँक खात्यांत पैसे भरा, असे सांगत सायबर भामट्यांनी पोलिसांच्या नावे सेवानिवृत्त व्यक्तीस तब्बल 50 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये (Nashik News) घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना 8592769683 व 8222856817 या क्रमांकांच्या मोबाईलवरून बोलणाऱ्या व चॅटिंग करणाऱ्या इसमांनी, तसेच विजय खन्ना व राहुल गुप्ता या नावांच्या इसमांनी मुंबई सायबर क्राईम बॅचमधून बोलत असल्याचे भासविले. 


50 लाखांना गंडा 


त्यानंतर या आरोपींनी फिर्यादीला तुमचा मोबाईल क्रमांक हा मनी लाँडरिंगमध्ये संशयास्पद आढळून आला आहे. यातून सुटका करून घ्यायची असल्यास त्यांना बँक खात्यातील जमा असलेली रक्कम ही संशयितांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांना दि. 2 ते 14 जून 2024 या कालावधीत इंटरनेट, फोन पेद्वारे, तसेच स्काय अॅपच्या माध्यमातून 49 लाख 89 हजार रुपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत. 


कंटेनरमधून साडेचार लाखांचे कॉईल पेपर, कॉपर पार्टची चोरी


कंटेनरमध्ये ठेवलेले साडेचार लाख रुपये किमतीचे कॉईल पेपर व कॉपरचे पार्ट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना अंबड हद्दीत घडली, याबाबत नबी मोहंमद मेहबूब शेख (रा. सिद्धिविनायक सोसायटी, अंबड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.  नबी मोहंमद मेहबूब शेख यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. शेख यांनी सातपूर- अंबड लिंक रोडवर लोखंडी कंटेनरमध्ये ठेवलेले 3 लाख 22 हजार 294 रुपये किमतीचे कॉपरचे विविध प्रकारच्या पार्टचे 765 किलो ग्रॅम स्क्रॅप व 1 लाख 22 हजार 279 रुपये किमतीचे 2 हजार 700 किलो वजनाचे अॅल्युमिनियम कॉईल पेपर असे एकूण 4 लाख 44 हजार 573 रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Gondia News : शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; दोन भावांनी पाच जणांना गंडवलं


बनावट मद्याच्या कारखान्यावर एलसीबीची धाड; कोट्यवधींच्या मद्यासह गांजा जप्त, धुळ्यात मोठी कारवाई