Gondia News गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील  (Gondia News) आमगाव शहरात शेअर मार्केटच्या (Share Market) नावाखाली दोन भावंडांनी कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात त्यांनी तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या दोन भावंडांवर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोन भावंडांनी पाच जणांची फसवणूक (Fraud) केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. तर यात फसवणूक झालेल्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत असून यातील संशयित आरोपी भावांना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे.


शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक  


शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याकाठी 7 ते 8 टक्के परतावा देण्याचे आमिष देत या दोघा भावांनी लोकांना लुटले. सुरवातीला पाच लोकांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली असली तरी फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आमगाव शहरातील बनिया मोहल्लातील किसन चंपालाल पांडे (वय 21) आणि  कन्हयालाल चंपालाल पांडे (वय 24) असे या संशयित आरोपींची नावे आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून झटपट (रिटर्न) देण्याचे आमिष दाखवून बनगाव येथील चलुराज व्यंकटरंगप्पा कमैय्या (वय 58) यांच्याकडून 3  कोटी 19 लाख 75 हजार रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार केला.


संशयित आरोपी भावंडांनी कमैय्या यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीकरिता पैसे दिले तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला 7 टक्के दराने व्याज देऊ, असे आमिष दाखवले. सुरुवातीला कमैय्या तयार झाले नाहीत. परंतु सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्याने त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिले.  2023 ला दिलेल्या पैशांची गरज असल्याने कमैय्या यांनी किसन पांडे याच्याकडे पैसे परत करण्याबाबत विचारणा केली. परंतु तो नेहमी काही ना काही कारणे सांगून टाळाटाळ करू लागला.  


दोन भावांनी पाच जणांना गंडवलं, पोलीसांनी ठोकल्या बेड्या


दरम्यान, कमैय्या यांना संशय आल्याने त्यांनी पैसे परत करण्याबाबत तगादा लावला. तरी देखील संशयित भावंडांनी पैसे देण्यास तयारी न दाखवल्याने कमैय्या यांना आपली फसवणूक झाल्याचे समजून आले. परिणामी, कमैय्या पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांनी सांगितला. या तक्रारीवरुन 3 कोटी 19 लाख 75 हजाराने फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावंडांवर आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम 420, 418, 403, 406, 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून या संशयित आरोपींना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात आणखी फसवणूक झाल्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच फसवणुकीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या