Nashik Water Crisis : नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सातपूर-त्र्यंबक रोड  येथील अमृत गार्डन चौकातील सुला चौका जवळ फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले आहे . शिवाय पुढील दोन दिवस शहरात पाणीबानी असणार आहे. नाशिक मनपा आयुक्तांनी तातडीने दोन दिवसांत ही पाईपलाईन दुरुस्ती चे आदेश दिले आहेत.


नाशिक शहराला गंगापूर धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र आज दुपारच्या सुमारास सातपुर त्र्यंबक रोडवर नाशिक मनपाची १२०० मी.मी. व्यासाची पाइपलाइन फुटली आहे. त्याचा परीणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. मनपाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केले जात आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दि.25 ऑगस्ट रोजी या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. दोन ते तीन दिवसात काम पूर्ण करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.  


दरम्यान पाईपलाईन गळती ही मुख्य पाईपलाईनवर असल्याने पाणीपुरवठा बंद करुन पाईपलाईन दुरुस्तीचे काम करावे लागले. यामुळे सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यावर परीणाम झाला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून सुरू केलेले काम लवकर पूर्ण करून घ्यावे व मुख्य पाइपलाइनचे काम पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.


युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरु
दरम्यान 1200  मीमी व्यासाची पीएससी सिमेंटची पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात अचानक गळती सुरू झाल्याने पाईपलाईन दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले आहे. पाईपलाईन गळतीचे काम हे 25 फुट खोल आहे. पाईपलाईन गळती ही मुख्य पाईपलाईनवर असल्याने पाणीपुरवठा बंद करुन पाईपलाईन दुरुस्तीचे काम करावे लागले. सदर दुरुस्तीचे काम  सुरु आहे. कामाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात असल्याने पाईपलाईन गळती पुर्णपणे बंद होत नसल्याने पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त झाली आहे. 

सातपूर, पश्चिम विभागात पाणी नाही


सातपूर त्र्यंबक रोड, येथील अमृत गार्डन चौकातील 1200 मी.मी.व्यासाची पीएससी सिमेंटची पाईपलाईनची मोठ्या प्रमाणात अचानक गळती सुरू झाली आहे. उ पाईपलाईन पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पाईपलाईन गळतीचे काम हे 25 फुट खोल असुन पावसाळा सुरु असल्याने पावसात काम करावे लागले. पपया नर्सरी चौकातील पाईपलाईनवरील क्रॉस कनेक्शन करावे लागणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवार दि. 26 ऑगस्ट सकाळ पासुन ते शनिवार दि. 27 ऑगस्ट रात्री पर्यंत  संपूर्ण दोन दिवस पाणी पुरवठा होणार नाही. 


या परिसरात पाणी नाही...
सातपुर कॉलनी, पपया नर्सरी परीसर, त्रंबकरोड परीसर, महाराष्ट हाऊसिंग कॉलनी, सातपुर गाव, स्वारबाबा नगर, महादेववाडी, जे.पी.नगर, सातपुर मळे विभाग, संतोषीमाता नगर, गौतम नगर, कांबळे वाडी, सातपुर कॉलनी, समतानगर, विनायक संकुल, खोडे पार्क, आठ हजार कॉलनी, कृष्णनगर, वीस हजार कॉलनी, शिवकॉलनी, सुयोजित कॉलनी, कामगार नगरचा काही भाग विकास कॉलनी. तसेच जुना प्रभाग क्र 26 मधील मोगल नगर, साळुंके नगर, वावरे नगर, शिवशक्ती नगर व चौक, आय.टी.आय.परिसर, खुटवड नगर मटाले नगर, आर्शिवाद नगर, संजीवनगर, जाधव संकुल, पाटील पार्क, विरार संकुल .
 
नाशिक पश्चिम विभाग : जुना प्रभाग क्र.12 
लवाटे नगर, संभाजी चौक, उषा किरण सोसायटी, पत्रकार कॉलनी, तिडके कॉलनी, कालिका मंदिर मागील भाग, सहवास नगर, राहुल नगर, मुंबई नाका परीसर मिलिंद नगर, मातोश्री नगर, महेश नगर, राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र परिसर, वनविहार कॉलनी, संतकबीर नगर, पारिजात नगर, समर्थ नगर महात्मानगर परिसर या भागात पाणीपुरवठा होणार नाही.


सिडको विभागातील परिसर


 शनिवार दि. 27 ऑगस्ट रोजी पुर्ण दिवसपाणी पुरवठा होणार नाही व दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. सिडको विभागातील जुना प्रभाग क्र.25 मधील इंद्र नगरी, कामठवाडे गांव व परिसर
जुना प्रभाग क्र.27- अलिबाबा नगर, दातीर वस्ती, चुंचाळे घरकुल योजना, दत्त नगर, कारगील चौक, चुंचाळे गांव परीसर. तसेच जुना प्रभाग क्र.28- लक्ष्मी नगर, अंबड गांव व परिसर, माऊली लॉन्स परिसर, वृंदावन नगर, अंबडगांव ते माऊली लॉन्स मधील पुर्व व पश्चिमेकडील परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.