Abhijeet Patil : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील देवळा तालुक्यात (Deola Taluka) आयकर विभागाने छापे (Income Tax) टाकले असून या छाप्यात देवळा तालुक्यातील विठेवाडी मधील वसंतदादा साखर कारखान्यावर (Vasantdada Sakhal Karkhana) छापा टाकला आहे. त्यामुळे कारखाना संचालकाचे दहावे दणाणले आहेत.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील विठेवाडी परिसरात अभिजीत पाटील यांनी वसंत दादा साखर कारखाना भाडेतत्वावर घेतलेला आहे. मात्र काही दिवसांपासून अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे सत्र सुरू आहे. राज्यातील पंढरपूर धाराशिव सोलापूर पाठोपाठ आता आयकर विभागाने नाशिकमध्ये ही अभिजीत पाटील यांनी घेतलेल्या मालमत्तांवर छापे टाकण्यात येत आहेत. त्यामुळे अभिजीत पाटील यांना चांगला धक्का बसला आहे.
मूळचे पंढरपूर येथील असलेले तरुण उद्योजक म्हणून ओळख असलेले अभिजीत पाटील यांनी अनेक ठिकाणी राज्यातील अनेक ठिकाणी भाडेतत्त्वावर कारखाने खरेदी केले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी अभिजीत पाटील यांच्यावर आयकर विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. अभिजीत पाटील यांनी गेल्या काही वर्षांमध्ये चार खाजगी कारखाने विकत घेतले तर काही भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतले आहेत. त्यामुळे अभिजीत पाटील यांच्या कडील मालमत्ता तपांसाठी आयकर विभाग त्यांच्या मालमत्तांवर धाड टाकत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाने नाशिकच्या देवळा तालुक्यात असलेल्या वसंत दादा साखर कारखान्यावर धाड टाकली आहे. एकीकडे एक कारखाना चालवूनही अनेक नेत्यांना जमत नसल्याचे निदर्शनास येते. तर अनेकदा शेतकऱ्यांची बिल तशीच अटकून राहतात. पण अभिजीत पाटलांनी पाच वर्षात पाच कारखाने चालवायला घेऊन शेतकऱ्यांना खुश केले होते. मात्र आता आयकर विभागाने धाड टाकल्याने पाटलांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कोण आहेत अभिजित पाटील
अभिजीत पाटील हे मूळचे पंढरपूरचे असून ते ठेकेदार होते. काही वर्षांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. आधी धाराशिव कारखाना नंतर नांदेड नाशिकलाही कारखाना चालवायला घेतला. वीस वर्षांपासून बंद पडलेला सांगोला सहकारी कारखाना घेतला. पाटील यांनी 35 दिवसांत सांगोला कारखाना रुळावर आणला.
नाशिकच्या शेतकऱ्यांची पसंती
अभिजित पाटील यांचे नाव ऐकून गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या विठेवाडी परिसरातील वसंत दादा पाटील कारखान्यासाठी सभासदांनी गळ घातली. पाटील यांनी तात्काळ यासाठी पसंती दर्शवली. त्यानुसार पाटील वसाका ला उभारी दिली. दरम्यान एक कारखाना चालवूनही अनेक नेत्यांना जमत नसल्याचे आपण पाहतो शेतकऱ्यांची बिल तसेच अटकून राहतात. पण अभिजीत पाटलांनी पाच वर्षात पाच कारखाने चालवायला घेऊन शेतकऱ्यांना खुश केले होते. मात्र आता आयकर विभागाने धाड टाकल्याने पाटलांच्या अडचणीत वाढ झाली आहे.