Nashik Bajar Samiti : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Nashik Bajar Samiti) सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. आज (दि. 11) देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. नवीन सभापती निवडीपर्यंत बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर (Vinayak Malekar) यांची प्रभारी सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.
देविदास पिंगळे हे नाशिक बाजार समितीत मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कामकाज करत असल्याच्या आरोप करून पिंगळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या संचालकांनी माजी सभापती शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांच्या नेतृत्वाखाली 15 संचालकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सोमवार (दि.03) रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याअनुषंगाने आज (मंगळवारी) बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नाशिक डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षेतखाली व बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली.
चुंभळेंची खेळी यशस्वी, पिंगळेंची सत्ता उलथवली
या सभेत सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर नवीन सभापती निवडीपर्यंत बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर यांची प्रभारी सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून चुंभळे यांनी 10 संचालकांना सहलीसाठी परदेशात पाठवले होते ते सोमवारी सायंकाळी नाशिकमध्ये परतले होते. नुकताच शिवाजी चुंभळे यांनी महिनाभरापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपच्या मदतीने चुंभळे यांनी बाजार समितीमध्ये पिंगळे यांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच देविदास पिंगळे यांनी आपल्या गटाचे संचालक मंत्री गिरीश महाजन यांनी पैसे देवून फोडल्याचा आरोप केला होता. मात्र, हे सर्व आरोप शिवाजी चुंभळे यांनी फेटाळून लावले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या