Khwaja Sayyad Chishti Murder : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून आता येवला तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. येवला तालुक्यातील चिंचाेडी एमआयडीसी परीसरात काल राञी आठ वाजेच्या सुमारास एका अफगाण सुपी (Sufi Baba) सय्यद नांवाच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीनी गाेळ्या झाडुन हत्या केल्याची घटना घडली आहे. 


येवला तालुक्यातील चिचोंडी एमआयडीसी परिसरात एका अफगाणी (Afghanistan) सुफी युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असे या अफगाणी नागरिकाचे नाव आहे. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (Khwaja Sayyad Chishti) हा अफगाण धर्मगुरू (Muslim Spiritual Leader) असल्याची प्राथमिक माहिती असून आर्थिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय व्यक्त केला आहे. तर घटनेच्या दरम्यान गोळीबाराचा आवाज आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत दोघांना पकडले मात्र चौघेजण यातून निसटले आहेत. 


दरम्यान गाेळ्या झाडुन हत्या केल्यानंतर सदर अज्ञात मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून चार चाकी वाहनाने पळ काढला असल्याचे पाेलिसांनी सांगितले. सदर घटनेची माहिती मिळताच येवला शहर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक मनाेहर माेरे, आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. चिंचोडी परिसरात रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅबतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान चिचोंडी एमआयडीसी परिसरात अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलिस पाटील वनिता मढवई यांनी येवला शहर पोलिसांना दिली असुन वरीष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असुन तात्काळ चाैकशीचे आदेश दिले आहेत.


घटनेने खळबळ 
दरम्यान अफगाणी नागरिकाची (Sufi Baba Murder) हत्या झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून नेमका हा नागरिक कोणाकडे आला, पूर्ववैमनस्यातून खून झाला का? याचा शोध पोलीस घेत आहेत. संबंधित अफगाण नागरिकाची माहिती घेण्यात येत असून नेमका खून कोणत्या कारणांसाठी झाला याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. सदर घटनेतील अफगाणी नागरिक हा सिन्नर तालुक्यातील वावी परिसरामध्ये मिरगाव येथे दीड वर्षांपासून राहत असल्याची माहिती आहे.