Nashik News : प्रेमाला काही नाते नसते, प्रेम कधीही आणि कुणावरही जडते. मात्र प्रेमापोटी अनेकदा चुकीची पाऊले उचलली जातात. विशेषकरून प्रेमभंग झाल्यानंतर अनेकजण टोकाचा निर्णय घेतात. मात्र प्रेमभंगातून आलेल्या नैराश्यापोटी टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपविणे हे योग्य नाहीच. असं असूनही नाशिक (Nashik) शहरातील एका प्रेमवीराने प्रेमभंगातून विषारी औषध सेवन करीत आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला आहे. 


प्रेम प्रकरणातून भावनिक होत अल्पवयीन तरुणाने नाशिक शहरातील सरकारवाडा पोलिस (Nashik Police) कार्यालयात येत विषारी औषध सेवन (Poison) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवारात उपस्थित असलेल्या पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे या तरुणास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


राजेश रामसेवक भारती (28 रा. गवळी चाळ, गंगासागर कॉलनी, गंगापूररोड) असे या युवकाचे नाव आहे. राजेश यास मद्याचे व्यसन आहे. साध्य त्याच्या लग्नाची बोलणी सुरु होती. मात्र मद्याच्या व्यसनामुळे त्याचे लग्न जमण्यास अडचण येत होती. पाेलिसांच्या माहितीनुसार, या युवकाचा विवाह दाेनदा ठरूनही त्यास नकार मिळत हाेता. तसेच मद्याच्या व्यसनामुळे मुली त्याच्या समवेत लग्न करण्यास नकार देत असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले. आप्तस्वकीयांसह नातेवाईकांच्या मध्यस्थीतून विवाह ठरला जातो. मात्र राजेश वधूच्या भेटीपूर्वीच मद्याच्या नशेत मुलीशी मोबाईलवर संपर्क करीत असल्याने त्यास दोन मुलींनी नकार दिल्याचे समाेर आले आहे.


दरम्यान, राजेशने काल दुपारच्या सुमारास सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून मद्याच्या नशेत सरकारवाडा पाेलिस ठाण्याच्या ठाणे अंमलदार कक्षात उभे राहून उंदीर मारण्याचे औषध सेवन केले. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्याविरोधात या सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक निरीक्षक खैरणार करत आहेत.


नाशिक शहरातील दुसरी घटना 
दरम्यान नाशिक शहरातीलच पंचवटी परिसरातील हि घटना असून या युवकाने देखील प्रेमभंगातून स्वतःला संपविले आहे. काही कारणावरून प्रेयसीसोबत झालेल्या वादातून मुलाने मागचा पुढचा विचार न करता अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. आठ दिवस रुग्णालयात झुंज दिल्यानंतर त्याचे निधन झाले. हि घटना ताजी असतानाच शहरात प्रेमवीराने पोलीस ठाण्यात औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.