नाशिक : दरवर्षीप्रमाणे यंदाही संत निवृत्तीनाथ महाराजांची (Sant Nivrittinath Maharaj) पालखी चांदीच्या रथातून आषाढी वारीसाठी आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. त्र्यंबकेश्वर समाधी मंदिरापासून सवाद्य मिरवणुकीने प्रथम कुशावर्त तीर्थावर स्नान व पूजाविधी झाल्यानंतर तेथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbakeshwar Jyotirlinga) मंदिरापासून मार्गस्थ होत आहे. या पालखी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सहकुटुंब हजेरी लावली. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची राज ठाकरे यांच्याकडून आरती करण्यात आली. तसेच त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिराचेही राज ठाकरे यांनी दर्शन घेतले. 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असून काल रात्रीच त्यांचे नाशकात आगमन झाले आहे. आज सकाळी नाशिकहून त्र्यंबकेश्वर येथे जाताना राज ठाकरे यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. 


राज ठाकरे यांच्या हस्ते संत निवृत्तीनाथ मंदिरात पूजाविधी


राज ठाकरे त्र्यंबकेश्वर येथे दाखल होताच मनसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. राज ठाकरे यांच्या हस्ते निवृत्तीनाथ मंदिरात पूजाविधी करण्यात आले. त्यानंतर संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी जय हरी विठ्ठ्लच्या गजरात हजारो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले. निवृत्तिनाथ समाधी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून राज ठाकरेंचा सत्कार करण्यात आला.  


महादेव मंदिरात राज ठाकरेंकडून आरती 


त्यानंतर राज ठाकरे त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करताना मंदिरात भाविकांना दर्शन बंद करण्यात आले होते. मात्र त्यांनी स्वतः भाविकांना दर्शनासाठी सोडण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला केल्या. राज ठाकरे यांच्याकडून महादेव मंदिरात आरती आणि विधिवत पूजा करण्यात आली. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Amit Thackeray : आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आता थेट अमित ठाकरेंची एन्ट्री; वरळीत संभाव्य उमेदवारही ठरला!


मला विरोध करण्यासाठी काही, उघड म्हणजे 'बिनशर्ट' पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर पहिला हल्ला