Amit Thackeray : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांच्या  बैठकीत राज ठाकरे यांनी 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे यांनी थेट वरळी विधानसभेमध्ये लक्ष घातलं आहे. अमित ठाकरे वरळीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यामुळे वरळीमध्ये आता थेट आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असा सामना रंगणार आहे. अर्थात अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसले, तरी वरळीतून संदीप देशपांडे हे मनसेचे संभाव्य उमेदवार असण्याची चर्चा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरे यांनी यांनी एन्ट्री केली आहे.


लोकसभेला महायुती आघाडीला बिनशर्त पाठिंबा


दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि महायुती आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर या निवडणुका झाल्या. भाजपला 240 तर एनडीएला 293 जागा मिळाल्या. एनडीएला मिळालेल्या बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. या शपथविधीनंतर एकूण 71 जणांनी शपथ घेतली. मात्र या कार्यक्रमात राज ठाकरे कुठेच दिसले नाहीत.


राज यांनी घेतल्या चार सभा


मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राज ठाकरे यांना मानाचे निमंत्रण न मिळाल्याने मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केल होती. निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी अनेक शहरांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या सभा घेतल्या होत्या. राज यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ, कोकण मतदारसंघात नारायण राणे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि ठाण्यात नरेश म्हस्के यांचा प्रचार केला. हे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. आता लोकसभा निवडणूक संपली आहे. आता काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबत सर्वच पक्षांचे नेते आता सक्रिय झाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या