Uddhav Thackeray on Raj Thackeray : उद्धव ठाकरे नको म्हणून काही जणांनी उघड म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर लगावला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावर आज उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. दरम्यान, आपल्या भगव्या झेंड्यावर कुठलंच चिन्ह टाकू नका, आपल्या मशालीचा वेगळा प्रचार करा. छत्रपतींच्या भगव्यावर काहीच छापू नका, असा सल्ला उध्दव ठाकरेंनी दिला. 


या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे स्पष्ट झालंय. फक्त उध्दव ठाकरे नको म्हणून काही लोकांनी “बिनशर्ट” पाठींबा दिला, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. 


शिंदेंवर हल्लाबोल -


सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडणं, यंत्रणांचा धाक दाखवून विरोधकांना संपवणं हा शासकीय नक्षलवाद आहे, असे शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या विरोधात चुकीचा प्रचार शहरी नक्षलवाद्यांनी केला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, त्याला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.  


मिंदे आणि भाजपला सांगतो तुम्ही जर षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता धनुष्यबाणचिन्ह न घेता आणि शिवसेना  नाव न लावता निवडणूक लढा.  माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात. मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा. विधानसभासाठी मोदी तुम्ही सभा घ्या.. या मिंदेला बाजूला ठेवा, असे ठाकरे म्हणाले.  


आता लढाई सुरू झालीय, शेवटचा विजय मिळे पर्यंत थांबायचं नाही. मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की किती वेळ अजून निकालाला लागणार आहे. ही लढाई (पक्षाची कायदेशिर) वैयक्तीक नाही संविधान वाचवण्याची आहे, असे ठाकरे म्हणाले. 


उद्धव ठाकरे काय म्हणाले?


गेल्या आठवड्यात मविआची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मी सर्वांना धन्यवाद दिले. पण मी आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने सर्व देशभक्त ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, दलित या सर्वांना, मविआला मतदान करणाऱ्या सर्व देशभक्तांना मी धन्यवाद देतो. 


सलामीला भास्कर जाधव, मधल्या फळीत संजय राऊत यांनी भाषणं केली. आता शेवटचा बोलर फलंदाजीला आल्यावर काय परिस्थिती होते, तशी अवस्था माझी झाली आहे. शेवटी आलो असलो तरी 


जमलेल्या माझ्या लढावाय्या शिवसैनिकांनो! लोकसभा निवडणुकीच्या निकलानंतर पहिला आपला जाहीर कार्यक्रम आहे. शिवसेना म्हटल्यावर नवं चैतन्य आणि तरुणाई आली पाहिजे. मविआची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी मी धन्यवाद दिले आहे.पण पुन्हा एकदा शिवसेनेच्यावतीने सर्व हिंदू मुस्लिम शीख बौद्ध या सगळ्या धर्मांचे साथ दिल्याबद्दल आभार मानतो. 


मी शून्य आहे, यशाचे धनी तुम्ही आहात. आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठे जा तुम्हालाला कोणी रोखू शकत नाही. पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे. अहंकार जो मोदींमध्ये आहे. आता पुन्हा एकदा चर्चा करतात उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार.  ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडलं त्या नालायकांसोबत परत जायचं? आता त्यांची फाटलीये.