Nashik Protest : दिल्लीच्या (Delhi) श्रद्धा प्रकरणासह (Shradhha Walkar) नाशिकच्या (Nashik) म्हसरूळ परिसरातील ज्ञानपीठ आश्रमात सहा मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम हर्षल मोरेला (Harshal More) फाशी द्या अशी मागणी नाशिक शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात येत आली आहे. शिवाय अशा मागणीचे होर्डिंग शहरभर लावण्यात आले असून हे होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरतं आहे. 


माणुसकीला काळिमा फासणारी घटना दिल्ली शहरात घडली. वसईतील श्रद्धा वालकर या 26 वर्षीय तरुणीची तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (Aftab Poonawala) याने निघृण हत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण देशाचं हादरला. सहा महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेला मुलीच्या बापाने दिलेल्या तक्रारींनंतर वाचा फुटली आणि श्रद्धा वलकर हत्याकांड उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. आजही बाईक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे नाशिक शहरात मुलींवरील अत्याचाराचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकरणातील संशयित हर्षल मोरेला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणातील संशयिताना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नाशिक शहरातून करण्यात येत आहे. 


नाशिक शहरात आज लव्ह जिहाद (Love Jihad) प्रकरणी विराट मूक मोर्चा (Protest) काढण्यात येत असून दुसरीकडे या दोन्ही प्रकरणातील संशयितांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नाशिक शहरातील मुस्लिम बाधंवांनी केली आहे. मुस्लिम बाधंवांकडून शहरात बँनरबाजी करण्यात आली असून या बँनरवर 'भारत देश में महिलाओ के साथ अत्याचार करनेवालो को फौरन फाशी दो, आफताब पुनावाला, हर्षल बाळकृष्ण मोरे और ऐसे तमाम अत्याचारीयो को फासी दो' अशा आशयाची बँनरबाजी शहरात करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहरातील आदिवासी मुलींवर झालेला अत्याचार व दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड हे दोन्ही समाजाला काळिमा फासणारे असून यातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. 


आज विराट हिंदू मूक मोर्चा 
दरम्यान नाशिक शहरात आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या हर्षल मोरेसह श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावालाला देखिल फासावर लटकवण्याची मागणी त्यांनी केली जात आहे. तसं बघितलं तर एकीकडे आज लव्ह जिहाद विरोधात शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढत आफताबला फाशी देण्याची मागणी होत असतांनाच दुसरीकडे मुस्लिम समाज देखिल आफताबला फाशीची मागणी करत असल्याचं बघायला मिळत असून विराट हिंदू मूक मोर्चाच्या होर्डिंग समोरच मुस्लिम समाजाने हे होर्डिंग लावले आहे. एकूणच समाजातील अशा घातक वृत्तीना वेळीच ठेचण्याची आवश्यकता असून यासाठी सर्व समाजाने एकत्र येत यासाठी प्रवृत्तींना आळा घालणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.