Nashik Crime News: एकीकडे नाशिक शहरात (Nashik City) गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नसताना शहरासह जिल्ह्यात बनावट नोटा (Fake Notes) आढळून येण्याचे प्रकरण उघडकीस येत आहेत. यापूर्वी दोन प्रकरणे उघडकीस आली असतांना आता नाशिकच्या हरसूल भागात बनावट नोटा आढळून आल्या आहेत. नाशिकमध्ये गुन्हेगारीचे अनेक फंडे समोर येत असून काही दिवसांपूर्वी इडलीवाल्या अण्णाचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. तब्बल पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नाशिक शहरातील सिडको भागात भाजीपाला विक्रेत्यास ग्राहकाने बनावट नोट देत फसवणूक केल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील इतर विक्रेत्यांचे धाबे दणाणल्याचे पाहायला मिळाले. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भाग म्हणून ओळख असलेल्या हरसूल शहरात बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

 

हरसूल शहरात बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ही महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. हरसूल शहरातील बाजरपेठेत परिसरात शंभर ते दीडशे गावे येत असतात. अशातच या शहरातील ठाणा पाडा स्टँडजवळ दोन संशयित 17 हजार पाचशे रुपये किंमतीच्या बनावट नोटा चलनात आणताना संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिक तालुक्यातील संपत पारधी, तर कलकत्ता येथील मनोवर बैसउद्दीन शेख यास हरसूल पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांकडून जवळपास 04 हजार 290 रुपयांच्या खऱ्या नोटा अशा एकूण 21 हजार 790 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.  

 

एकीकडे नाशिक शहरात (Nashik) नोटा छपाईचा कारखाना आहे, त्याच नाशिक शहरात बनावट नोटां (Fake Money) वारंवार आढळून यात आहेत. काही दिवसांपूर्वी इडलीवाल्या अण्णांकडे बनावट नोटा आढळून आल्या होत्या. त्यानंतर सिडको परिसरातील भाजीवाल्याला ग्राहकाने फसवल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता हे लोन ग्रामीण भागात पसरल्याने खळबळ उडाली आहे. 

 

बनावट नोटांचे लोन ग्रामीण भागात...


मागील दोन महिन्यांपूर्वी नाशिक शहरात इडलीवाल्या अण्णाकडे बनावट नोटा आढळून आल्या होत्या. जवळपास पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सिडको परिसरात भाजीपाला विक्रेत्याला ग्राहकाने पाचशे ची बनावट नोट देत फसवणूक केल्याचे समोर आले होते. अशातच आता त्र्यंबक तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेली हरसूल बाजारपेठेत बनावट नोटांचे रॅकेट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.