RBI : आरबीआयकडून (RBI) नाशिक जिल्ह्यातील  गिरणा सहकारी बॅंकवर (Nashik Zilha Girna Sahkari Bank)  व्यवहारावर निर्बंध आणले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, आता ग्राहकांना पुढील सहा महिने बँकेतून पैसे काढण्यासही मनाई केली आहे, या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.  त्यामुळे ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मागील काही वर्षांपासून बँक आर्थिक संकटाला सामोरे जात होती.


या बँकेतील 99.87 टक्के खातेधारक हे Deposit Insurance and Credit Guarantee Corporation विमा योजनेतंर्गत येतात. या योजनेनुसार, खातेदारांना 5 लाख रुपयांच्या विम्याचे कवच मिळते. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार हे निर्बंध सहा महिन्यापर्यंत लागू असणार आहे. त्याशिवाय, बँकेच्या कामकाजावरही रिझर्व्ह बँक देखरेख ठेवणार आहे. दरम्यान, बॅंकेची परिस्थिती सुधारल्यास यात बदल होण्याची शक्यता आहे.




बँकेने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय बॅंक कोणतेही लोन रिन्यू करणार नाही. तसेच कोणतीही गुंतवणूक करणार नाही. कुणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्विकारणार नाही, कोणतीही मालमत्ता विकण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत. 


बँकेची सध्याची स्थिती पाहता ग्राहकांना बचत, चालू किंवा इतर खात्यांमधून पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.  बँका त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहतील. बँकेवर बंदी असली तरी   पूर्वीप्रमाणेच कामकाज सुरू ठेवतील. 


DICGC म्हणजे काय?


Deposit Insurance and Credit Guarantee Corporation नुसार बँक जमा असलेल्या रक्कमेवर ग्राहकांना विमा सुरक्षा मिळते. हे विमा संरक्षण अधिकाधिक 5 लाख रुपयांपर्यंत मिळते. या विम्यामुळे बँक बुडाली तरी ग्राहकांना कमाल 5 लाख रुपये मिळू शकतील.   


संबंधित बातम्या :



RBI चे महाराष्ट्रातील 'या' बँकेवर निर्बंध, ठेवीदारांना फक्त 15 हजार रुपयेच काढता येणार



भारताचा परकीय चलन आणि सोन्याचा साठा घटला, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर


रिझर्व्ह बँकेच्या ग्लोबल ट्रेड सेटलमेंटबद्दल माहिती आहे का? अर्थव्यवस्थेसाठी मोठी वाटचाल ठरणाऱ्या यंत्रणेची ही सविस्तर