नाशिक :  शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेनेत दुफळी निर्माण असून दोन गट पाहायला मिळत आहेत. या परिस्थितीत दोघेही एकमेकांवर चिखल फेक करताना दिसत आहेत त्याचे पडसाद नाशिक शहरातही उमटत आहेत.  आज नाशकात शिवसेनेने बंडखोरांविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शिवसेनेतर्फे आज पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बंडखोर आमदारांचे पुतळे जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

शिवसैनिकांच्या वतीने शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून ते अमरधामपर्यंत शिवसेनेचे बंडखोर नेत्यांच्या प्रतिकात्म पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. 'लाल लाल पागोटा गुलाबी शेला... अशा आशयाचे पोस्टर मोर्चात लक्ष वेधून घेत होते. दरम्यान, या मोर्चात शहरातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोर मंत्री व आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

दरम्यान नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून शिंदेसेना आणि शिवसेना या दोन्ही गटात वाद धुमसत आहे. दोनच दिवसांपूर्वी शिंदे समर्थकांनी लावलेली बॅनरला शिवसैनिकांनी काळे फासले. तर दुसऱ्या दिवशी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात लावण्यात आलेल्या फलकावर बंडखोर सुहास कांदे, दादा भुसे यांच्या नावांना देखील शिवसेना महिला आघाडीकडून काळे फासण्यात आले आहे. 

 

सध्या राजकीय वातावरणाबरोबर कार्यकर्त्यांमध्येही संतापाची आग धुमसत आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणी समर्थकांकडून आंदोलन, निषेध, मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेकडून शिंदे सेने विरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करीत शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Political Crisis Sanjay Raut : संजय राऊत यांचे बंडखोरांना आव्हान, एका बापाचे असाल तर...


Maharashtra Political Crisis: काही पालख्या गुजरातला, तर काही गुवाहटीला, आम्ही मात्र माऊलींसोबत: सचिन अहिर