Sanjay Raut : गेल्या दोन दिवसंपासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर आमदारांवर चांगलीच आगपाखड केली आहे. शिवाय बंडखोर आता कारण देताय मात्र यावेळी संजय राऊत यांनी यावेळी बंडखोरीची दहा कारणं सांगितली आहेत. 


आमदारांच्या बंडखोरीची दहा कारणं


पहिल्या दिवशीच कारण : हिंदुत्वासाठी बाहेर पडलो.  दुसरा दिवशीच कारण : राष्ट्रवादीचे लोक आम्हाला निधी देत नाहीत. तिसरा दिवशीच कारण : उद्धव ठाकरे भेटीला वेळ देत नव्हते.  चौथा दिवशीच कारण : आदित्य ठाकरे राज्यात ढवळाढवळ करतात, म्हणून बाहेर पडलो. पाचव्या दिवशीच कारण : भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष सहावा दिवशीच कारण : विठ्ठला भोवती बडवे जास्त झाले आहेत, म्हणून आम्ही बाहेर पडलो. सातवा दिवशीच कारण :  संजय राउतांमुळे बाहेर पडलो. आठवा दिवशीच कारण : शरद पवारांमुळे बाहेर पडलो.  नवव्या दिवशीच कारण :  काय झाडी, काय डोंगर हाटेल


दहाव्या दिवशीच कारण : बंडखोर आमदार चिमणराव पाटलांनी सांगितलेले की गुलाबराव पाटील यांना कंटाळून बाहेर पडलो. दरम्यान पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले चिमणराव पाटील हे जळगाव येथील पारोळा चे आमदार आहेत, त्यांनी हे दहावा कारण सांगितले. संजय राऊत पुढे म्हणाले मात्र सगळी कारण बकवास असून मुख्य कारण मी सांगतो. मुख्य कारण हे आहे की खोकेबाजी. पन्नास खोक्यामुळे राजकारण झालंय. त्यासाठी या खोके बाजीला ठोके बाजीने उत्तर देऊ.


शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने डॅमेज करण्यासाठी मोहीम हाती घेतली असून त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे निष्ठां यात्रेत असून खासदार संजय राऊत हे राज्यभरात शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. त्याच अनुषंगाने शिवसनेच्या पक्ष बांधणीची सुरवात हि नाशिकमधून करण्यात आली आहे. संजय राऊत मागील दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असून आज शहरातील इच्छामणी लॉन्स येथे शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांची चांगलीच खरडपट्टी काढली. याचबरोबर भाजप आणि शिंदे गटावरही ताशेरे ओढले. 


संबंधित महत्वाच्या बातम्या : 


Sanjay Raut : शिवसेनेशी बेईमानी करण सोपं काम नाही, वाचा संजय राऊत यांच्या भाषणातील दहा मुद्दे
Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, खासदार संजय राऊत यांचा टोला