Sanjay Raut : शिवसेनेशी (Shivsena)  बेईमानी करण सोपं काम नाही, ही बाळासाहेबांची (Balasaheb Thakaray) शिवसेना आहे, इथं असली नकली काय नाय, सगळं असलीच असल्याचे सांगत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप शिंदे गटावर ताशेरे ओढले.


गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. काल नाशिक ग्रामिण च्या शी सैनिकांशी संवाद साधल्यानंर ते आज नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्या भाषणातील दहा मुद्दे.


नाशिकचा हनुमान आमचा, गदा आमची तशी शिवसेना आमची आहे. बाळासाहेबांनी शिवसेना इथं रुजवली तो आमचा बाप आहे. हा वाद खऱ्या खोट्याचा नसून इमान आणि बेईमान मधला आहे.


शिवसैनिकाला कोणी पळवून नेऊ नये, चाळीस आमदार म्हणजे शिवसेना नाही. तसेच चार पाच खासदार इकडे तिकडे गेले म्हणजे शिवसेना हलली अस होत नाही. आगामी निवडणुकांत 100 आमदार आणि 25 खासदार निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे. 


बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या नसानसांत शिवसेना रुजवलेली आहे. त्यामुळे शिवसेना आमच्याच बापाची आहे, तुम्ही पन्नास लोक नेले ते पचनार नाही, गुलाबरावांचा जुलाबराव झाल्याशिवाय राहणार नाही. शिंदे गटात असलेले आमदार चिमणराव पाटील यांची खदखद बघा. ते म्हणतात जळगावातील शिवसेना संपविणारा माणूस म्हणजे गुलाबराव पाटील, ही त्यांची खदखद आहे, ही कारणे बकवास आहेत.


ज्यांची नगरसेवक व्हायची लायकी नाही त्यांना आमदार केलं, मंत्री केलं. मात्र त्यांनीच शिवसेनेच्या पाठीशी खंजीर खुपसला कोरोना काळात उद्धव ठाकरे प्रकृती बिघडली असताना लढले. महाराष्ट्राची प्रकृती बिघडली असताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सावरला.महाराष्ट्रात जनतेला ज्यांनी कोरोना काळात सांभाळलं, ते उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत.


धनुष्यबाण आमचं पंचप्राण असून धनुष्यबाण सुद्धा शिवसेनेचाच राहील,  आमचा महाराष्ट्र, आमची माती,  आमची माणसं जपणारे आहोत. आम्ही लाल किल्ल्याला सलाम करत नाहीत. मराठी माणसाचे हायकमांड मातोश्री आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसाठी मातोश्री सतत लढत राहील. महाराष्ट्र घडविण्यासाठी , मुंबई जगविण्यासाठी 105 जणांनी हुतात्मानी प्राणाची आहुती दिली. आज सत्तेत आलेले महाराष्ट्र तोडायचा फोडायची भाषा करतात. हे होऊ देणार नाही, 


संजय राऊत घाबरणारा नाही, शिवसेनेने जो अभिमान दिला त्याच्याशी गद्दारी नाही, आम्ही खंजीर खुपसणारे नाहीत, उद्धव ठाकरे तब्येत व्यवस्थित नसताना हा घात केला. मात्र यापुढे गाठ शिवसेनेशी अन शिवसैनिकांशी आहे. बाळासाहेबांचा फोटो लावला म्हणजे आपलं होत नाही, त्यासाठी आपलं स करावं लागतं, मृत्यूचा खाचा वर ठेवत असतो, तुम्ही काय आमच्याशी सामना करणार, त्यासाठी शिवसेनेत असाव लागत, शिवसेनेत आयुष्य घालवावा लागत.


एक भारतीय सेना सीमेवर राहून देशाचं रक्षण करते आहे, दुसरी शिवसेना महाराष्ट्राच्या जनतेचे रक्षण करते आहे, या सेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे आहेत. रावणाच राज्य जाळून गेलं, हिटलरचा अंत झाला, भले भले गेले गेले हे कोण? त्यामुळे शिवसैनिकानो धनुष्यबाण हातात ठेवा, आता नव्याने लढाई सुरू होत आहे.