Goat Milk Soap : दूध म्हटलं कि गायीचं, म्हशीचं आणि शेळीच दूध  येते. या दुधापासून अनेक खाण्याचे पदार्थ बनविले जातात. जे सर्रास आपणात दैनंदिन स्वयंपाकात वापरत असतो. मात्र दुधाचा साबण बनवला तर? खरंच शेळीच्या (Goat Milk) दुधापासून अंघोळीचा साबण (Soap) बनविण्याचा अनोखा प्रयोग नाशिकमधील (Nashik) काही महिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रयोगाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे. 


सध्या नाशिकमध्ये पंचायत समिती (Panchayat Samiti) आवारात रानभाजी महोत्सव (Ranbhaji Festival) सुरु असून यात विविध रान भाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जिल्हाभरातील महिला बचत गटाचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये अनेक बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, पदार्थ विक्रीसाठी आहे. याच बचत गटातील महिलांनी शेळीच्या दुधापासून साबण बनविण्याचा प्रयोग केला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील हरणशिकार महिलांनी शेळीच्या दुधापासून गोट मिल्क सोप (Goat Milk Soap) या साबणाची निर्मिती केली आहे. या आरोग्यवर्धक साबणाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.


शेळी पाळायची आणि गरजेच्या वेळी विकायची, एवढाच समज ग्रामीण भागात आहे. शेळीच दूध हे आरोग्यासाठी चांगले असते. हे दूध शहरात फारस मिळत नाही. मात्र, ग्रामीण भागात शेळीपालन होत असल्यामुळे दूध जास्त प्रमाणात असते.  मात्र शेळीचे दूधही उत्पन्न मिळवून देईल, असा विचारही शेळीपालकांना शिवला नाही. मात्र हा पायंडा मोडून काढत शेळीच्या दुधाचा आरोग्यासाठी चांगला फायदा बघता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शेळीच्या दुधापासून गोट मिल्क सोप (Goat Milk Soap) हा आरोग्यवर्धक साबण बनवला आहे. या साबणाला चांगली मागणी होत आहे.


सध्या जिल्ह्यासह राज्यभरात बचत गटांना मागणी वाढली आहे. गृहिणी घरखर्च चालविण्यासाठी बचत गटात सहभागी होत आहेत. अशातच काही महिला बचत गटांच्या माध्यमातून नाव करू पाहत आहेत. त्याचेच ताज उदाहरण म्हणजे हरणशिकार गावातील चाळीस महिलांनी एकत्र येत उभारलेला उन्नती बचत गट. या बचत गटाच्या माध्यमातून आपण काही तरी व्यवसाय सुरू करूयात असे या महिलांनी ठरवले. बचत गट स्थापन करून शासनाच्या मदतीने काही तरी व्यवसाय सुरू करू काही महिलांनी शेळीच्या दुधाच्या साबणाची कल्पना मांडली. कारण असे साबण जास्त कोणी उत्पादित करत नाही आणि विशेष म्हणजे आरोग्यासाठी चांगले असल्यामुळे शहरात मागणी जास्त असते. सर्व ठरल्यानंतर या महिलांनी साबण कसा बनवायचा हे पंचायत समिती मधील उमेद या अभियाना अंतर्गत प्रशिक्षण घेतले आणि आज घडीला या महिला उत्तम प्रकारे साबण तयार करून तो बाजारात विकत आहेत. यातून महिलांना चांगला नफा मिळत आहे.


‘गोट मिल्क सोप’चे गुण 
हा साबण आरोग्यासाठी फायदेशिर आहे. हा साबण वापरल्यानंतर आपली त्वचा ही मुलायम होते. चेहऱ्यावरील डाग, वांग नष्ट करते. शरीरावरील पुरळ किंवा खाज नाहीशी करते. कोणत्याही प्रकारच्या स्कीन ॲलर्जीवर गुणकारी असणारा हा साबण चंदन आणि हळद या दोन प्रकारांत कोणतेही रसायन किंवा मशीनचा उपयोग न करता हाताने तयार केला जातो. आपल्या डोळ्याच्या खाली जे काळे वलय पडते ते हा साबण वापरल्यानंतर पूर्णपणे नाहीसे होतात. आपल्या चेहऱ्यावर जे पुरळ असतात. ते देखील या साबणामुळे जातात. विशेष म्हणजे हा साबण पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. त्यामुळे हा साबण आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे.


साबणाची किंमत किती आहे?
शेळीच्या दुधापासून बनवलेल्या या साबणची किंमत सर्व सामान्य माणसाला परवडेल अशी आहे. 100 ग्रॅम साबणाची किंमत 30 रुपये आहे. अगदी कमी किंमतीत विक्री केली जाते. साबण बनवण्यासाठी एकूण खर्च 20 रुपये येतो. एका साबण मागे 10 रुपये नफा मिळतो. दिवसाला 1000 साबण तयार केले जातात. बचत गटाला महिन्याच्या काठी जवळपास 3 लाख रुपये या साबण विक्री मधून मिळतात..