Nashik News : नाशिकमधील (Nashik) वाचन प्रेमींसाठी आनंदाची बातमी असून शासकीय विभागीय (Goverment Library) वाचनालय खुले करण्यात आले असून तब्बल 95 हजाराहून अधिक पुस्तके या ठिकाणी उपलब्ध असल्याने वाचकांना अनोखी मेजवानी असणार आहे. या पार्श्वभूमीवर वाचनालय प्रशासनाने पुस्तकांचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 
                                                               
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) शासकीय विभागीय ग्रंथालयात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील 95 हजार 316 ग्रंथसंपदा उपलब्ध असून जिल्ह्यातील वाचनप्रेमी व विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार आहे. या सुविधेचा ग्रंथालयाचे सभासद होवून जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालयातील ग्रंथपाल कविता महाजन यांनी केले आहे.


दरम्यान यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, वाचनप्रेमी व विद्यार्थ्यांना सभासद होण्यासाठी महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान अर्ज विक्री करण्यात येणार असून अर्ज प्राप्त झाल्यानंतर 10 ते 15 तारखेपर्यंत जमा करणे आवश्यक असणार आहे. सभासद होण्यासाठी ग्रंथालयाची दोन वर्षासाठीची वार्षिक वर्गणी 100 रूपये व अनामत रक्कम (डिपॉझीट) 500 रूपये असणार आहे. तसेच विविध धर्मादाय संस्था, शाळा, कॉलेज व महाविद्यालयांना सहभाग घेता येणार असून सभासद होण्यासाठी दोन वर्षासाठीची वार्षिक वर्गणी 750 रूपये व अनामत रक्कम (डिपॉझीट) 2500 रूपये  असणार आहे. या बाबतच्या अधिक माहितीसाठी शासकीय विभागीय ग्रंथालय, नाशिक रोड, नाशिक येथे प्रत्यक्ष किंवा 0253-2465682 या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे ग्रंथपाल कविता महाजन यांनी कळविले आहे.


असे व्हा सभासद 
वाचनप्रेमी व विद्यार्थ्यांना सभासद होण्यासाठी महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान अर्ज विक्री करण्यात येणार असून अर्ज प्राप्त झाल्यानंतर 10 ते 15 तारखेपर्यंत जमा करणे आवश्यक असणार आहे. सभासद होण्यासाठी ग्रंथालयाची दोन वर्षासाठीची वार्षिक वर्गणी 100 रूपये व अनामत रक्कम (डिपॉझीट) 500 रूपये असणार आहे. तसेच विविध धर्मादाय संस्था, शाळा, कॉलेज व महाविद्यालयांना सहभाग घेता येणार असून सभासद होण्यासाठी दोन वर्षासाठीची वार्षिक वर्गणी 750 रूपये व अनामत रक्कम (डिपॉझीट) 2500 रूपये  असणार आहे. या बाबतच्या अधिक माहितीसाठी शासकीय विभागीय ग्रंथालय, नाशिक रोड, नाशिक येथे प्रत्यक्ष किंवा 0253-2465682 या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे ग्रंथपाल कविता महाजन यांनी कळविले आहे.


वाचनालये झाली डिजिटल 
आजच्या धावपळीच्या युगात पुस्तक वाचन बाजूला पडले आहे. अनेकजण मात्र वेळ कढून पुस्तक वाचनाचा आनंद जोपासताना दिसतात. तर काही जण मोबाईलच्या विश्वातच वाचनालय खुलं करत असल्याचे दिसून येते. अनेक जण सध्या मोबाईल वरच वाचन करण्याचे प्रमाण वाढले आहे. डिजिटल लायब्ररी हि संकल्पना या माध्यमातून उदयास आली असून अनेक डिजिटल अँप्स देखील आल्याचे पाहायला मिळते. ग्रंथालयात जाऊन आपण एक किंवा दोन पुस्तके घेऊन ती सोबत बाळगून वाचत होतो. परंतु आता तसे न करता अनेक पुस्तके वाचकांना केव्हाही आणि कुठेही गरज असेल तेव्हा तसेच वेळ असेल तेव्हा आपल्या आता मोबाईलवर ऑनलाइन वाचता येत आहेत.