RakshaBandhan : नाशिकमध्ये (Nashik) रक्षाबंधन सणासाठी (Rakshabandhan) बाजारपेठ सज्ज झाल्या असून शहरात एका रुपयांपासून ते आठशे रुपयांपर्यंत राखी पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी सोशल मीडियावर फॉलो केल्यानंतर डिस्काउंट देखील मिळत आहेत. 


एका दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्रावण महिन्यातील (Sawan Mahina) बहीण भावाच्या नाते सांगणारा रक्षा बंधन सणाला नाशिक नगरी सजली आहे.  मागील दोन वर्ष कोरोनामुळे (Corona) बहीण भावला रक्षा बंधन साजरी करता आली नाही. मात्र यंदा मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरी करण्यात येत आहे. 


गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक जणांना रक्षाबंधन साजरा करता आला नाही. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याने नाशिकमध्ये रक्षाबंधन पवित्र सणासाठी बाजार पेठा सज्ज झाल्या आहेत. बाजारात आकर्षक, सुंदर आणि सुबक राख्या बाजारात आल्या असून तरुणींची लगबग पाहायला मिळते आहे.


नाशिकच्या कॉलेजरोड, मेनरोड, शालिमार आदी परिसरात रक्षाबांधनानिमित राख्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. कॉलेजरोड परिसरात राखी मार्केटमध्ये एक  रुपयांपासून ते आठशे रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. यामध्ये किड्स राखी, डायमंड राखी, चंदन राखी तसेच अमेरिकन डायमंड राख्यांना विशेष पसंती दिली जात आहे. 


फॉलो करा, डिस्काउंट मिळवा!
दरम्यान नाशिकच्या कॉलेजरोड परिसरात राखी मार्केट सजले आहे. मागील पंधरा दिवसांपासून येथे ग्राहकांची रेलचेल आहे. त्यामुळे येथील व्यवसायिकांनी स्वतःच्या सोशल मीडियाचा वापर करत ग्राहकांना आकर्षित करत आहेत. सोशल मीडियावर फॉलो केल्यास राखी खरेदीवर सूट मिळत आहे. ही अनोखी कल्पना येथील व्यापारी वापरत आहेत.


डायमंड राख्यांची चलती
दोन वर्षे कोरोनामुळे बहीण भावाचा हा सण कुरिअर, पोस्टाद्वारे साजरा करण्यात आला. मात्र यंदा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे बाजारात सध्या किड्स राख्यांसह डायमंड राख्यांना विशेष मागणी आहे. डायमंड राख्यांची किंमत 100 रुपयांपासून पूढे असून आठशे रुपयांपर्यंत अमेरिकन डायमंडने भरलेली राखी पहायला मिळत आहे.