Dada Bhuse : नाशिकमधून (Nashik) शिंदे गटात सामील झालेले आमदार दादा भुसे (MLA Dada Bhuse) यांची मंत्री मंडळात वर्णी लागली. कालच्या मंत्रीमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) त्यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. दादा भुसेंसह समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण असताना एका बातमीने दादा भुसेंच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणार्धात आनंदावर विरजण पडले.


दरम्यान शिंदे फडणवीस (Shinde Government) सरकारचा काल दीड महिन्यानंतर शपथ विधी पार पडला. यात अठरा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नाशिकचे तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांना देखील कॅबिनेट पदी विराजमान होता येणार आहे. दरम्यान काल दादा भुसे मंत्री पदाची शपथ घेत असताना घरात विवाहित पुतणीचे निधन झाल्याची वार्ता कळली. त्यानंतर दादा भुसेंसह मालेगावी परिवार शोकसागरात बुडाला.


मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे हे मालेगावी असताना घरात पुतणीचे निधन झाल्यावर समजले. त्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सायंकाळपर्यंत घरीच होते. रात्री उशिरा त्यांना मुंबईहुन फोन आला. त्यांना तातडीने मुबंई ला निघावं लागलं. घरात अशी परिस्थिती असताना मनावर दगड ते मुंबईला शपथविधीसाठी पोहचले. 


आमदार दादा भुसे यांचे बंधू दत्तू भुसे यांची विवाहित मुलगी भाग्यश्री संदीप पाटील यांचे निधन झाले. याचवेळी दादा भुसे यांना मुंबई गाठावी लागली. दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे भुसे कुटुंबियांच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. 


परिवारात दुःखाचे वातावरण
मालेगाव बाह्य चे विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांचा शिंदे मंत्रिमंडळात समावेश झाला. मात्र घरात विवाहित पुतणीचे निधन झाल्याचे परिवार शोकसागरात बुडाला होता. त्याचवेळी दादा भुसे हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेत होते. दरम्यान दादा भुसेंच्या मंत्रिपदाच्या आनंदाला दुःखाची किनार  होती. 


कार्यकर्त्यांचा जल्लोष...
दरम्यान दादा भुसे यांचा शिंदे मंत्री मंडळात समावेश झाला. भुसे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर मालेगावी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. अनेकांनी ढोल ताशे, पेढे खाऊ घातले.