Nashik Crime : तुम्हाला व्हाट्सअँपवर (Whatsapp) एखाद्याने मॅसेज करून लिहले असेल कि, 'मला पैसे पाठवा, मी या ठिकाणी अधिकारी म्हणून कार्यरत आहे, हवं तर व्हाट्सअँप चेक करा' तेव्हा तुम्ही चुकूनही त्या व्यक्तीला मॅसेज किंवा ओटीपी (OTP) देऊ नका, कारण असे केल्यास क्षणार्धात तुमच्या बँक अकाउंटमधील पैसे गायब होऊ शकतात. कारण अशा पद्धतीने फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. नाशिकचे (Nashik) नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत पुलकुंडावर (Chandrakant Pulkundawar) याबाबतीत हा प्रसंग घडल्याने हॅकर्सनी लोकांच्या बँक अकाउंटवर (Bank Account) डल्ला मारण्याची नवी पद्धत शोधल्याचे समोर आले आहे.
एकीकडे सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून मोबाईल (Mobile) हातातलं साधन झाल्याने अनेकजण याचा गैरवापर करताना आढळत आहेत. त्यामुळे अनेक क्लुप्त्या वापरून बँक खाते रिकामे होण्याची शक्यता असते. आता प्रत्येकजण अँड्रॉइड मोबाईल (Anroid Mobile) फोन वापरतो. त्यामुळे अनेकदा मोबाईलवर विविध नावाने असंख्य लिंक येतात. मात्र, कुठल्याही अनोळखी लिंक डाउनलोड किंवा ओपन केल्यास आपण पुन्हा नव्या लिंककडे जात असतो. यातून लुटारू टोळीकडे तुमच्या ऑनलाईन व्यवहाराची सर्व माहिती आणि इतर अपडेट पोहचते. मग टोळी त्वरित तुमच्या बँकेवर डल्ला मारून बँक खाते रिकामे होते.
नाशिक महानगरपालिकाचे नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याबाबत सायबर क्राईम संदर्भात घटना घडली आहे. मनपा आयुक्तच्या नावाने अज्ञाताने अधिकाऱ्यांकडे पैसे मागितल्याचे उघड झाले आहे. मनपा आयुक्तांना एका भामट्याने व्हॉटसअप मेसेजच्या माध्यमातून लिंक पाठवून अकाउंटमध्ये पैसे पाठविण्याच्या सूचना केली. आयुक्त पुलकुंडावर यांनी तपासणी केली असता संबंधित व्यक्तीच्या डीपीवर आयुक्तांचा फोटो व्हाट्सअँप डीपी ला ठेवल्याचे समोर आले. या माध्यमातून समोरच्याला स्वतः पुलकुंडवार असल्याचे भासवित पैशांची मागणी केली. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.
नाशिक महापालिका आयुक्त म्हणाले कि, ज्या व्यक्तीचा नंबरवरून मेसेज केला जात आहे. ती व्यक्ती आळेफाटा परिसरातील असून त्यांच्या नंबरचा गैरवापर केला जात असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात ते आळेफाटा पोलिसांत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करणार असून कोणीही बनावट मेसेजला बळी पडू नका असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. त्यामुळे संबंधित ठकसेनेने थेट आयएएस अधिकाऱ्याला टारगेट केल्याने सामान्य माणसाचं काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
व्हाट्सअँपवरूनही फसवणूक
सध्या व्हाट्सअँप वापरणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अनेकदा लुटारू हे फसव्या लिंक पाठवून ग्राहकांना आकर्षित करत असतात. अनेकदा मोबाईल धारक सहजरित्या या लिंक ओपन करून पाहतात. अन आपसूक मोबाईल धारकाची बँक डिटेल्स चोरट्याकडे जाते. त्यामुळे बँक असो किंवा इतर कुठलेही शासकीय विभाग कधी लिंक पाठवत नाही. मोबाईलवर येणाऱ्या असंख्य लिंक या फसव्या असतात. याची दखल घेऊन कुठल्याही प्रकारे लिंक डाउनलोड किंवा लिंकद्वारे व्यवहार करू नका, अन्यथा ऑनलाईन भामटे हे तुमच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित करीत आहेत. लिंक आली म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. तेव्हा अशा बनावट लिंकला बळी पडू नका, सतर्क राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.