Nashik CNG Rate : देशभरासह राज्यात महागाई दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेल (Petrol) दरात कपात करून नागरिकांना राज्य सरकारने दिलासा दिला होता. मात्र दुसरीकडे जीएसटीच्या (GST) रूपात अनेक उत्पादने महागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता सीएनजीच्या (CNG Rate) दरात चार रुपयांनी वाढ करण्यात आल्याने पुन्हा एकदा महागाईचा शॉक नागरिकांना बसला आहे.
सद्यस्थितीत महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात कमी झाली असली तरी इतर जीवनावश्यक कमालीच्या महाग झाल्या आहेत. आता रोज वापर असणाऱ्या सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता नाशिककरांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एकदा सीएनजी गॅस दरात मोठी वाढ करण्यात असून सीएनजी वाहन धारकांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिक शहरात (Nashik City) महिन्यात सीएनजी वाहन धारकांचे प्रमाण वाढले आहे. सुरवातीला सीएनजी दर कमी असल्याने अनेक नागरिकांनी सीएनजी वाहनास प्राधान्य दिले. मात्र हळूहळू सीएनजी दरात वाढ होत असून आता पेट्रोल दराच्या जवळपास सीएनजी दर गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सीएनजी गॅस दर वाढत असल्याने वाहन चालकांना मोठा फटका याचा सहन करावा लागतो आहे. यापूर्वी नाशिक शहरात सीएनजीचे दर 91.90 रुपये वरून नाशिकमध्ये आता सीएनजी गॅस 95.90 रुपयांवर पोहचला आहे. दरम्यान काल मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर लागू करण्यात आल्याने नागरिकांना मोठा झटका बसला आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).