Nashik News : पहिल्या श्रावणी सोमवारी (Shravani Somwar) त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) भाविकांनी तोबा गर्दी केली. तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी बम बम भोलेचा गजरात त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले आहे. मंदिर उघडल्यापासून भाविकांच्या रांगा होत्या तर रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. 


श्रावण (Sawan) सुरु झाल्यानंतर वेध लागतात ते पहिल्या श्रावणी सोमवारचे. त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग (Trimbakeshwer Jotirling) असल्याने तसेच भाविक ब्रम्हगिरी प्रदक्षिणेची (Bramhgiri Feri) परंपरा असल्याने भाविक दर्शनासाठी तसेच प्रदक्षिणेसाठी गर्दी करतात. शिवाय तब्बल दोन वर्षानंतर निर्बंध हटल्याने जय भोलेचा गजर करीत एक लाखावर भाविकांनी पहिल्या श्रावणी साेमवारी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनबारीचे झाल्याने भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले मात्र. भाविकांचा ओघ वाढल्याने अनेक भाविकांनी पेड दर्शन घेण्यास प्राधान्य दिले. 


कोरोनामुळे (Corona) दोन वर्ष त्र्यंबकेश्वर मंदिर बंद होते. शिवाय भाविकांचा ओघही कमी होता. मात्र मागील काही महिन्यापासून त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासही खुले झाले आहे. त्यामुळे भाविक, पर्यटक त्र्यंबकेश्वर दाखल होत आहेत. तर आता श्रावण सुरु झाल्याने निसर्ग पर्यटन आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. तर तर काल पहिला श्रावणी सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वरात भाविकांचा महापूर होता. पहाटे चार वाजेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या हाेत्या. तर पेड दर्शनाकरिता अडीच तास तर माेफत दर्शनासाठी सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागला. 


महाराष्ट्रातील भाविकांकरीता पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी होती. दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. त्यापैकी 52 हजार भाविकांनी पेड दर्शनाला पसंती दिली. यातूनच देवस्थानला 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. माेफत रांगेतील दर्शनाकरिता चार ते पाच तासांचा वेळ लागत हाेता. मात्र पेड दर्शन अडीच तासांतच पूर्ण करता येत हाेते. कुटुंबासह दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पूर्व दरवाजा व देणगी दर्शन उत्तर दरवाजात रांगा लागल्या होत्या.


पेड दर्शनाचीही व्यवस्था 
त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून प्रति भाविक दोनशे रुपये आकारून पेड दर्शनाचीही व्यवस्था उपलब्ध असल्याने व निम्म्यावेळात दर्शन होत असल्याने सायंकाळपर्यंत पाच हजारावर भाविकांनी याचा फायदा घेतला. ज्यातून अकरा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न देवस्थानला मिळाले. कोरोना कालावधीनंतर आलेला हा पहिलाच श्रावणी साेमवार असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. 


मात्र भाविकांचे झाले हाल.... 
दरम्यान पहिला श्रावणी सोमवार असल्याने त्र्यंबक देवस्थान व त्र्यंबकेश्वर प्रशासनाकडून गर्दी लक्षात घेता नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे पार्कींगसह इतर व्यवस्था करण्यात आली होती. शहरात वाहनांची गर्दी होऊ नये. यासाठी शहराच्या बाहेर विविध ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना एक किलोमीटरवर वाहन लावून मग शहरात पायी येत प्रवेश करावा लागत होता. शिवाय दर्शनालाही गर्दी असल्याने भाविकांना सह तास रांगेत उभे राहावे लागले. मात्र यावर देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता, मंदिरात, मंदिराच्या बाहेर स्क्रीन लावण्यात आले होते.