Nashik News : नाशिकच्या (Nashik) प्रसिद्ध रामशेज किल्ल्यावर (Ramshej Fort) फिरण्यासाठी गेलेल्या एका वीस वर्षीय तरुणाचा हृदय विकाराच्या (Heart Attack) झटक्याने मृत्यू (Youth Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा तरुणांमधील हृदय विकार बळावत असल्याचे चित्र अधोरेखित झाले आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर नाशिक शहर परिसर हिरवाईने फुलून गेला आहे. यामुळे धबधबे, नैसर्गिक ठिकाणे असलेल्या पर्यटन स्थळांवर गर्दी वाढत आहे. अशातच वीकेंडसाजरा करण्यासाठी गेलेल्या नाशिकचा एका तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अजय सरोवर असे निधन झालेल्या 20 वर्षीय मुलाचे नाव आहे.
सध्या रामशेज किल्ला बहरला असून पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान आज शनिवार असल्याने शहरातील नवीन नाशिक येथील सरोवर कुटुंब सुट्टीची मजा घेण्यासाठी किल्ल्यावर गेले होते. दरम्यान त्यांचा मुलगा अजय सरोवर ( वय 20) हा चक्कर येऊन पडल्याने त्याला उपचार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.
अजय हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तर त्याच्या वडिलांचा फळाचा व्यवसाय आहे. अजयच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर काही दिवसांपूर्वी नाशिक वनविभागाने पर्यटन स्थळावर बंदी घातली ती उठविल्याने पुन्हा एकदा पर्यटकांची पावले गड किल्ल्यावर वळू लागली आहेत.
काही दिवसांपूर्वी साल्हेरची घटना
दरम्यान काही दिवसांपूर्वी बागलाणच्या साल्हेर किल्ल्यावरून दोन तरुण कोसळल्याची घटना घडली होती. यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा तरुणाला वाचविण्यात यश आले होते. त्यावेळी पोलीस अधिकारी खांडवी या तरुणास पाठगुळी बसवून किल्ल्यावरून खाली उतरवले होते.
तरुणांमध्ये वाढता हृदयविकार
आजलकच्या तरुणांची जीवनशैली अतिशय बिघडलेली आहे. कधीही झोपणे, कधीही उठणे, केव्हाही जेवण करणे, नियमित व्यायाम न करणे शरीरातील पाणी पातळी कमी असणे, मानसिक , शारीरिक ताणतणाव आदींमुळे शारीरिक आजार बळावतात. त्यामुळे तरुणांनी योग्य आहार, व्यायाम करणे आवश्यक असल्याची मत हृदयविकार तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी व्यक्त केले.