Nashik News : नाशिक (Nashik) शहरात जसा पाऊस थांबला तशी धुळीने (Dust) नागरीकांना हैराण केले आहे. पावसाने वाहून आलेल्या धुळीने, मातीचे कण उडून वाहनचालकांच्या डोळ्यांत जात असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पावसामुळे वाहून आलेली माती, धूळ रस्त्यावर आलेली आहे. त्यामुळे वाहन चालविताना हि धूळ थेट नाकातोंडात जात असून यामुळे वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहेत. धूळ डोळ्यात गेल्याने वाहनावर लक्ष विचलित होत असून अपघात घडत आहेत.
नाशिक शहर परिसरात मागील दोन धुवांधार पाऊस बरसला. सध्या पावसाने शहरात उघडीप दिली असल्याने वाहनचालकांसह नागरिक वर्दळ शहरभर दिसत आहे. अशातच आता पावसामुळे वाहून आलेली माती, धूळ रस्त्यावर आलेली आहे. त्यामुळे वाहन चालविताना हि धूळ थेट नाकातोंडात जात असून यामुळे वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहेत. धूळ डोळ्यात गेल्याने वाहनावर लक्ष विचलित होत असून अपघात घडत आहेत. तर दुसरीकडे पावसामुळे शहरातील खड्ड्यांची दाणादाण उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिककेने अनेक भागातील खड्डेही बुजवले आहेत.
दरम्यान महापालिकेने (Nashik NMC) खड्डे तर बुजवले मात्र वाहनांमुळे पुन्हा एकदा खड्डा भरलेली खडी बाहेर पडू लागली आहे. त्याचेच धूलिकण डोळ्यांत जात असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे नाशिककर खड्ड्यातून काहीअंशी सुलटे असताना आता धुळीमुळे हैराण झाल्याचे स्थिती साधय शहरात आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या नाशिककरांना पाऊस उघडल्यानंतर आता फुकाट्याचा सामना करावा लागत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्ते कोरडे झाले आहेत, तर पावसामुळे वाहून आलेली माती आणि रस्त्याच्या कडेला साचलेल्या मातीचे कण डोळ्यात उडत असल्याने दुचाकी चालत त्रस्त झाले आहेत
मुख्य रस्त्यांवर धूळच धूळ!
नाशिक शहरातील सर्वच रस्त्यांवर धुळीची समस्या निर्माण झाली असून रस्त्यावरून चालताना उडणारी धूळ व खडीमुळे दुचाकी चालक व नागरिकांना मार्गक्रमण करताना तारेवरचे कसरत करावी लागत आहे. धुळीमुळे डोळे चुरचुरच असल्याने दुचाकी चालक डोळे चोळत असताना वाहनांकडे काहीसे दुर्लक्ष होऊन वाहने खड्ड्यात जाऊन आदळत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने रस्त्यावरील खडी व धुळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मनपाने बुजविलेल्या रस्त्यांवरील डांबरीकरणाची खडी उकडून गेली आहे. शहरात पंधरा दिवस सातत्याने पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने नाशिककर त्रस्त झाले होते. या संदर्भात वारंवार तक्रार येत असल्याने महापालिकेने रस्त्यावर मलमपट्टी सुरुवात केली आहे. मात्र हे काम पूर्ण होत नाही तोच आता धूळ आणि माती उडत असल्याने खबरदारी घ्यावी लागत आहे.