Nashik Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचं संघटन कौशल्य अत्यंत चांगला आहे, पिढी पिढीत अंतर असते. हे आपण मान्यच करतो...मात्र आपण एकच विचार केला पाहिजे की आपला उमेदवार सक्षम आहे का? सत्यजीत जरी आपल्यासाठी नवीन असला तरी मी त्याचा जामीनदार असल्याचे सांगत त्याला निवडून द्यावे असे आवाहन सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी केले आहे. 


नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात सध्या जोरदार प्रचार दौरे सुरु असून आज सत्यजीत तांबे हे नाशिकमध्ये आहेत. तर सुधीर तांबे हे अहमदनगर येथील जामखेड तालुक्यात प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी ते जामखेड तालुक्यातील एका महाविद्यालयात ते बोलत होते.  ते यावेळी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून युवक काँग्रेसच्या मध्यमातून सत्यजीत काम करतो आहे, प्रत्येक मतदार त्याला जवळून ओळखतो आहे. हा काही राजकीय विषय नाही. सत्यजीतचे संघटन कौशल्य मतदारसंघासहित राज्यभरात चांगले आहे. कोणत्याही निवडणुकीत आपण उमेदवार पाहतो, तो उमेदवार या निवडणुकीसाठी सक्षम आहे का? त्यामुळे अशा उमेदवाराच्या पाठीमागे आपण उभे राहिले पाहिजे, अशी माझी इच्छा असल्याचे ते म्हणाले. 


ते पुढे म्हणाले, एखाद्याला नवीन माणसाला बँकेत जाऊन पैसे काढायचे असल्यास जामीनदार लागतो, तस सत्यजीत जरी आपल्यासाठी नवीन असला तरी मी त्याचा जामीनदार आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत हा तुमच्या ओळखीचा आहे, तुमच्या जवळचा आहे, म्हणून त्याला निवडून द्या. या निवडणुकीत राजकारण नसत, मला निवडून देताना लोकांनी कधीही पक्ष पाहिला नाही, सर्वानीच चांगले सहकार्य केले आहे, आताही तुम्ही सहकार्य कराल असे अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वानी एकत्र येऊन एक चांगला सक्षम उमेदवारास निवडून द्यावे असे आवाहन सुधीर तांबे याची केले आहे. 


उमेदवाराचे प्रचार दौरे जोरात 


नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे तर सत्यजीत तांबे यांना अनेक शिक्षक संघटनासह राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे. सध्या या दोघांत नाशिक पदवीधरची लढत होणार हे निश्चित आहे. त्यामुळेच माघारीचा दिवस संपल्यानंतर मतदारसंघात दोघेही उमेदवार प्रचार दौरे करत आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत सध्या टशन पाहायला मिळत असून उमेवारांचा प्रचार जोरदारपणे सुरु आहे. यात शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. 


सत्यजीत तांबे नाशिकमध्ये..


नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून निफाड, विंचूर चांदवड आनी मालेगाव धुळे असा त्यांचा दौरा असणार आहे... निफाड शहरातील चौकात कार्यकर्त्यांनी तांबे यांच स्वागत केल आहे तर आज विविध संस्थांना सत्यजीत तांबे भेटी देणार आहे. युवकांनी निवडणूक हाती घेतली असून युवकांचे प्रश्न असतील किंवा उद्योगधंदे बाबत वेगवेगळे प्रश्न आहेत. हे प्रश्न सगळे सोडवण्यासाठी एक हक्काचा प्रतिनिधी मिळणार आहे, असे युवकांमध्ये चित्र असल्याचे सत्यजीत तांबे यांनी नाशिकमध्ये येण्यापूर्वी वक्तव्य केले आहे.