Nashik Satyajeet Tambe : मी अनेक संघटनांच्या संस्थांच्या पाठिंब्यावर निवडून आलेलो आहे. टीडीएफ सारख्या संस्थेसह इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. या सगळ्याचा विचार करून मी अपक्ष निवडून आलेलो असल्यामुळे मी भविष्यामध्ये अपक्षच राहील अशी माझी भूमिका असल्याचे वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले आहे. मी काँग्रेस (Congress) कधीही सोडली नाही, पण आमदार म्हणून अपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचं सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं. 


नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) ज्या पद्धतीने सुरवातीपासून राजकीय नाट्य पाहायला मिळाले. या राजकीय नाट्यावर अखेर सत्यजित तांबेंनी (Satyajeet Tambe) महत्वाचा खुलासा केला आहे. नाशिक पदवीधारच्या  (Nashik) निवडणूक निकालानंतर तांबे हे आपली भूमिका मांडणार होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी करणार असल्याचे पक्षातील वरिष्ठाना सांगितले. मात्र वडील आमदार असल्याने तुम्हाला तिकीट देता येणार नसल्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली. त्यांनतर जे राजकरण सुरु झालं, तांबे परिवाराला बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचलं गेलं, यात बाळासाहेब थोरात यांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे.


सत्यजित तांबे यावेळी म्हणाले, कि निवडणुकीच्या काळात अनेक शिक्षक संघटना आम्हाला पाठिंबा दिला आहे. टीडीएफ आणि शिक्षक भारतीसह अनेक संघटनांनी पाठिशी उभे राहून आम्हाला मदत केली. त्यामुळे या पुढील काळात देखील मी अपक्ष म्हणूनच काम करणार आहे. या सगळ्या संघटनांनी मदत केल्याने निवडणूक जिंकलो आहे, मी काँग्रेसमध्येच आहे, मात्र आमदार म्हणून भविष्यामध्ये अपक्षच राहील अशी माझी भूमिका आहे. लोकहिताचे काम करण्यासाठी वेळोवेळी जे जे सरकार असेल, त्या सरकारकडून मदत घेईल, विरोधी पक्ष नेत्यांकडे जाईल, सगळ्यांकडे जाईल, मार्गदर्शन घेईल अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. 


सत्यजीत तांबे पुढे म्हणाले कि, शरद पवार सगळ्यात पहिली भूमिका घेतली का हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे काँग्रेसने अंतर्गत मिटवावा परंतु त्याच्याकडेही दुर्लक्ष खऱ्या अर्थाने करण्यात आलं आणि हे सगळं राजकारण झालं. मात्र आता ही माझी शेवटची प्रेस आहे, आता काम करायचंय. त्यामुळे राजकारणाच्या बाहेर जाऊन आता काम करणार आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात होईल. लोकांनी, मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला असून त्यांच्यासाठी  काम करायचं. आता पूर्ण वेळ लोकांसाठी काम करत सुरुवात करणार असल्याचे सत्यजित तांबे म्हणाले.