Satyajeet Tambe Nashik : नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबेंचा विजय, पुढची रणनीती काय?

Satyajeet Tambe : "सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं आहे. मी पैसे वाटले नाहीत तर लोकांना प्रेम दिलं," अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी दिली. राज्यभर चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निकालानंतर गेल्या महिनाभरापासून नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला आहे. निकाल लागल्यानंतर तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. दरम्यान 4 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच मी पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola