Nashik News : रानभाज्या महोत्सवातून (Wild Vegetable Festival) उत्पादक ते ग्राहक साखळी तयार होत असून या माध्यमातून आदिवासी भागातील संस्कृती (Tribal Culture) समोर आणण्याचे व जतन करण्याचे महत्वाचे काम होत आहे. या महोत्सवातून विविध रानभाज्यांबरोबर महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या विविध वस्तु एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून आदिवासी भागातील स्वयंसहायता गटांना उत्पन मिळणार असून रानभाज्यांचे संवर्धन होणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrushna Game) यांनी केले.


आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या रसायनविरहीत विषमुक्त भाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना व्हावी म्हणून सलग तीसऱ्या वर्षी नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik Zilha Parishad) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने  पंचायत समितीच्या (Nashik Panchayat Samiti) आवारात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बोलताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे नैसर्गिक पद्धतीने उगविणा-या रानभाज्या आरोग्यासाठी पोषक असून रानभाज्या महात्सवातून त्यांची शहरातील नागरिकांना ओळख होणार आहे. नाशिक शहरातील (Nashik)Nashik नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


प्रास्ताविकात बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रानभाज्या महोत्सवाची माहिती देताना सलग तिस-या वर्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दर शुक्रवारी 10 ते 2 या वेळेत नाशिककरांना रानभाज्या खरेदी करता येणार आहेत. या महोत्सवात प्रत्येक तालुकयातील बचत गटांना सहभागी करुन घेण्यात आले असून आज 34 गटांनी यात सहभाग नोंदविला आहे. आदिवासी बांधवांना व महिला गटांना आपल्या वस्तु विक्रीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तीन महिने चालणा-या या महोत्सवात रानभाज्यांबरोबर बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तुही विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या असून नाशिक शहरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


उमेद (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत रानभाज्यांची शहरी भागातील नागरिकांना ओळख व्हावी व बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळावे या उददेशाने उमेद – अभियानामार्फत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दर शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 02 या कालावधीत पावसाळयातील रानभाज्या विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांनी दिली. रानभाज्या महोत्सव यशस्वी करण्यासाठी उमेद (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



रानभाज्या आरोग्यासाठी पोषक
रासायनिक खते आणि विषारी औषधांनी युक्त भाज्यांच्या भडिमारामुळे जगभरातील लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण-आदिवासी भागात नैर्सर्गिकरित्या येणाऱ्या रानभाज्यांचे महत्व लक्षात घेणे अत्यावश्यक बनले आहे. या रानभाज्या आरोग्यासाठी पोषक असून या महोत्सवात आदिवासी भगिनींनी रानातून गोळा केलेल्या जीवनसत्व, लोह, कॅल्शियमनी भरपूर युक्त भाज्या, फळे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. अनेक पौष्टीक भाज्या, त्यांची बनवण्याची पद्धत आणि उपलब्धतेचे ठिकाण ही सर्व माहिती या महोत्सवात देण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.