Nashik News : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimabkeshwer) तालुक्यातील आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला होता. मासिक पाळी (Period) आल्याने मुलीला वृक्षारोपण (Tree Plant) करण्यापासून रोखल होत. अखेर आज विद्यार्थिनीच्या हस्ते अंनिसकडून वृक्षारोपण करण्यात आले आहे.


पुरोगामी महाराष्ट्राला चीड आणणारी घटना काल नाशिकमध्ये (Nashik) उघडकीस आली होती. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर (Trimabkeshwer) तालुक्यातील देवगाव आश्रम शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला मानसिक विकृतीला सामोरे जावे लागत होते. अखेर या विद्यार्थिनीने सर्वांसमोर हा निंदनीय प्रकार उघडकीस आणला.


देवगाव आश्रम शाळेत (Deogoan Ashram Shala) शिकणारी ही मुलगी बारावीत शिकते. काही दिवसांपूर्वी झाड लावत असतांना शिक्षकांनी तीस मासिक पाळी आली म्हणून वृक्षारोपण करण्यापासून रोखले होते. अकरावीत असताना लावलेली झाडे मरून गेल्याचे उदाहरण शिक्षकाने देत तिला वृक्षारोपण करण्यापासून थांबविण्यात आले होते.


दरम्यान या प्रकरणी विद्यार्थिनीने थेट नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे दार ठोठावले. यावेळी अप्पर आयुक्तांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर हा सगळा प्रकार माध्यमांनी उजेडात आणला. त्यांनतर आज अंनिसने थेट शाळा गाठत या शाळेच्या आवारात सदर विद्यार्थिनीकडून वृक्षारोपण केले आहे.


महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास भवन संचलित शासकीय कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवगाव येथील  महाराष्ट्रभर गाजलेल्या मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास प्रतिबंध करणाऱ्या प्रकरणाची महाराष्ट्र अंनिसने गांभीर्याने दखल घेतली. कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. यावेळी मासिक पाळी संदर्भात वयात येणाऱ्या मुलींच्या शरीरात नेमके काय बदल होतात,   या संदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकत्र संबंधित विद्यार्थिनीकडून वृक्षारोपण करण्यात आले.


आता मासिक पाळी किंवा तत्सम अंधश्रद्धांना बळी पडणार नाही आणि इतर माझ्या मैत्रिणी व विरोध करणाऱ्यांना यापुढे अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थिनीने दिली आहे.


नेमकं प्रकरण काय? 
मासिक पाळी (Menstrual cycle) आली म्हणून वृक्षारोपण (Tree Plant) करण्यापासून एका महिलेला रोखल्याच्या धक्कादायक घटना नाशकात (Nashik) घडली आहे. त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwer) देवगाव आश्रम शाळेत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. मासिक पाळी आलेल्या मुलींना झाड लावलं तर ते झाड जळतं, असा अजब तर्क शिक्षकांनी लावला आहे. या प्रकरणी पिढीत मुलींना आदिवासी विकास विभागाकडे (Tribla Development Department) तक्रार सुद्धा केलेली आहे.