Sanjay Raut : वारकरी संप्रदायाचे ((Warkari Samprday) नेते सुषमा अंधारेवर (Sushma Andhare) बोलत आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर का बोलले नाहीत, मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही बसले आहेत, जुने व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये (Nashik) पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सुषमा अंधारे याना टार्गेट केले जटस ल्याचा आरोप केला.
संजय राऊत यावेळी म्हणाले, शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे सातत्याने वारकरी वारकरी सांप्रदायाबरोबर राहिले. त्यांचे प्रश्न, त्यांच्या भूमिका, हिंदुत्ववाद असेल कधीही शिवसेनेला किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी वारकरी संप्रदायाचा अवमान केलेला नाही, करणार ही नाही, आमच्या स्वप्नातही नाही. पण गेल्या काही वर्षापासून सातत्याने जे भारतीय जनता पक्षाबरोबर नाही, म्हणजे ते हिंदुत्ववादी नाही अशा पद्धतीने आमच्यावर,आमच्या लोकांवर किंवा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्यावर टीका केली जात असून या सर्वांना एकप्रकारे टार्गेट केलं जातं आहे. त्यांना या संदर्भात वारकरी संप्रदायाच्या प्रमुख लोकांशी चर्चा सुरू असून स्वतः सुषमा अंधारे आणि त्यांची भूमिका मांडलेली आहे. वारकरी संप्रदाय आमचे सर्व दैवत असून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज,विठोबा माऊली असते यांच्याविषयी आमच्या मनात नितांत श्रद्धा असल्याचे ते म्हणाले.
सुषमा अंधारे यांना देखील टार्गेट केले जात असून 2009 च्या फायली काढत आहेत. त्यांनी आता वक्तव्य केले आहे का? नाही ना. तेव्हाचे व्हिडीओ जाणूनबुजून व्हायरल केले जात आहेत? मात्र दुसरीकडे सुषमा अंधारे शिवसेनेची बाजू मांडत फिरत आहेत, महाप्रबोधन यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. त्याचा राग येणं काही लोकांना साहजिकच आहे. काही वर्षांपूर्वी मेहबुबा मुफ्ती यांच्याविषयी भाजप गरळ ओकत होते, मात्र भाजपने आता मेहबुबा मुफ्तीबरोबर काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली आहे, त्यांचे व्हिडिओ काढायचे का? असा सवाल संजय राऊत यांनी केले आहे. राज्यपालांचे वक्तव्य का विसरत आहेत, सुधांशु त्रिवेदीवर कारवाई करा, प्रसाद लाडवर कारवाई करा, पर्यटन मंत्र्यांवर कारवाई करा,या से सवाल त्यांनी संजय राऊत यावेळी उपस्थित केले.
ते पुढे म्हणाले, वारकरी संप्रदायाचे नेते सुषमा अंधारेवर बोलत आहेत, ते छत्रपती अपमानावर का बोलले नाहीत, मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही बसले आहेत, जुने व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत? महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार असून महाराष्ट्रात याआधी असा मोर्चा निघाला नाही, असा मोर्चा निघणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच नेते यात असणार आहेत, अजित पवार, उद्धव ठाकरे नाना पटोले आदी असणार आहेत. बच्चू कडू कोणावरही टीका करू शकतात, उद्या आमचं सरकार आल तर ते आमच्या पुढे असतील, असे अनेक लोक आहेत, ते अस पुढे पुढे जायचे काम करतात. सरकार बदललं की आपली माणसं आणण्याचे प्रयोग सुरू असतात. मुंबई नगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. मात्र या घटना बाह्य सरकारची मानसिक तयारी नाही. त्यांच्या मनामध्ये पराभवाची भीती असल्याचे अंधेरीच्या पोटनिवडणुकीने दाखवून दिल्याचे ते म्हणाले.