Nashik Police : नाशिक (Nashik) शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नव्याने शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी स्वच्छने हे काम करणाऱ्या तरुणांकडून पोलीस आयुक्तालयाने ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. मात्र मानधनाशिवाय वार्डनला हे काम करावे लागणार आहे. त्यानुसार वाहतूक शाखेला शहरात 200 वार्डन अपेक्षित आहेत.
नाशिक (Nashik City) शहरात गेल्या काही दिवसात वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोजच शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक कोंडी (Nashik Traffic) पाहायला मिळते. आता पावसाला सुरुवात झाली असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने वाहतूक पोलिसांच्या मदतीला वार्डन नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रमुख रस्त्यांसह चौकात कोंडी होणाऱ्या वाहतुकीच्या संचलनासाठी स्वयंस्फूर्तीने वाहतूक कोंडी फोडण्यासह प्रबोधनासाठी तयार असलेल्या व्यक्तींना ट्रॅफिक वॉर्डन (Traffic Warden) म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयाने (nashik City Police) याबाबतची नोंदणी मोहीम सुरू केली असून आयुक्त अंकुश शिंदे यांनी ट्रॅफिक ऑर्डर नेमण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार उपायुक्त राऊत व सहाय्यक आयुक्त नितीन जाधव यांनी कार्यवाही केली असून शहर पोलीस पोलिसांच्या वाहतूक शाखेत 300 अंमलदार नियुक्त आहेत. शहराच्या परिघातील प्रत्येकी सात किलोमीटर अंतरासाठी एक अंमलदार कार्यरत आहे. गृह विभागाकडून नाशिक पोलीस दलासाठी वाढीव मनुष्यबळ मंजूर होत नसल्याने पोलीस ठाण्यासह वाहतूक नियोजनावर ताण येत आहे. परिणामी कारवाईत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नागरिकांच्या साथीने वाहतूक कोंडी फोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इथे करा ऑनलाइन अर्ज
दरम्यान ज्या उमेदवारांना वॉर्डन म्हणून काम करावयाचे आहे. त्यांच्यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी https://Forms.gle/qvys1pcnjzsh4sum7 या लिंक द्वारे अर्ज सादर करणार आहेत. 1 जुलै 15 जुलैपर्यंत ई नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर वाहतूक पोलिसांतर्फे त्याची पडताळणी करून निवड झालेल्यांना संपर्क साधला जाईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले आहे.
काय काय पात्रता लागेल?
वार्डन नेमणुकीसाठी अर्जदारचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, वयोगट, शिक्षण, रहिवास असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्द? व्यवसाय? येणाऱ्या भाषा? ट्रॅफिक गार्डन होण्याचे कारण? दिवसातून किती वेळ देणार? आरएसपी एनसीसी व एनएसएससी सदस्य होते किंवा आहेत? वाहतूक नियमांचे प्रशिक्षण घेतले आहे काय? सण उत्सवात वाहतूक विभागासोबत काम केले आहे काय? गुन्हे किंवा न्यायालयीन प्रकरणी प्रलंबित आहेत काय? यासह प्रतिज्ञापत्र या स्वरूपाची माहिती अर्जात असणार आहे.