Nashik Bus Accident : 'तारीख होती 08 ऑक्टोबर, भल्या पहाटेची वेळ, यवतमाळ-मुंबईला जाणारी खासगी ट्रॅव्हल्सची बस नाशिकच्या मिरची चौफुलीवर आली अन् पहाटेला ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात (Bus Fire Accident) झाला. क्षणार्धात बस पेटली, प्रवाशांचा आक्रोश, काही क्षणांत होत्याच नव्हतं झालं... जवळपास आठ लोकांचा होरपळून दुदैवी मृत्यू झाला. काळीज चिरणारा आकांत आणि वेदनांचा कल्लोळ हे एवढंच चित्र दिसत होतं, बाकी सगळं राख झालं होतं... आणि तो दिवसही होता शनिवारचाच, भल्या पहाटेचा अन् आजचा बस अपघातही शनिवारीच आणि भल्या पहाटेच...
बुलढाण्यात (Buldhana) समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपताघानंतर नाशिकमध्ये 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. नाशिकमधे छत्रपती संभाजीनगर रोडवर 8 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे पाच-साडेपाचच्या सुमारास बस आणि ट्रकचा अपघात (Nashik Bus Fire Accident) झाला होता. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता. यवतमाळहून मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस निघाली होती तर धुळ्याहून पुण्याच्या दिशेने ट्रक जात होता. या दोन्ही वाहनांचा नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेल जवळच्या चौकात भीषण अपघात झाला होता.
चिंतामणी ट्रॅव्हल्स ही बस मिरची चौफुलीवर (Mirchi Chaufuli) आली असताना बस आणि ट्रकमध्ये धडक झाली. यात ट्रॅव्हल बसला आग लागून 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की, काही वेळात झालेल्या स्फोटानं परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले होते. प्रत्यक्ष दर्शींच्या म्हणण्यानुसार, काहींनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही आगीतच होरपळले. अपघातानंतर बसनं पेट घेतला आणि साखर झोपेत असणाऱ्या 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. हा थरार आजही नाशिककरांना जसाच्या तसा आठवतोय. या अपघाताच्या आठवणी आजही समोर आल्या तरी काळजाचा थरकाप उडतो. आज समृद्धी महामार्गावरील (Samrudhhi Highway) बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा परिसरात नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या निमित्ताने नाशिक बस अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
आता चौफुलीवर काय उपायोजना?
नाशिकमध्ये बस दुर्घटना झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शहरातील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने अपघात टाळावेत, यासाठी उपाययोजना केल्या आहेत. या चौफुलीवर चारही बाजूला मोठे स्पीडब्रेकर बनविण्यात आले, रस्ता रुंदीकरण करण्यात आला आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या दुतर्फा असणारे अनधिकृत अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात आला. या चौकातील बेकायदा बांधकामं आणि अतिक्रमणे करणाऱ्यांना मनपाने नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार या चौकातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. जवळपासची हॉटेल दुकाने यांच्यावर हातोडा पाडण्यापूर्वी संबंधित दुकान मालकांनी बांधकामे काढली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :