Virginity Test : काही समाजात जातपंचायतच्या (Jat Panchayat) पंचासमोर कौमार्य परीक्षा (Virginity Test) घेतली जाते. न्यायालय काही प्रकरणात कौमार्य चाचणीचा निर्णय देत असते. वैद्यकीय अभ्यासक्रमात Medical syllabus) त्याचा उल्लेखही आहे. मात्र आता देशातील सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना (Medical Student) कौमार्य चाचणी कशी अवैज्ञानिक, अमानवी व भेदभाव करणारी आहे, असे शिकविले जाणार आहे. इतकेच नाही तर न्यायालयालाही ते पटवून दिले जाणार आहे. नुकताच हा ऐतिहासिक निर्णय झाल्याचे कौमार्य चाचणी विरोधी लढणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Superstition Eradication Committee) कार्यकर्त कृष्णा चांदगुडे यांनी ही माहिती दिली.


देशातील न्यायालये वैवाहिक, बलात्कार (Rape) व नपुसकत्व प्रकरणात महिला कुमारी आहे किंवा नाही हे जाणुन घेण्याचे निर्देश डाॅक्टरांना देत असतात. न्यायवैद्यकशास्त्रात या कौमार्य चाचणीचा उल्लेख आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा उल्लेख काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर देशभर ते शिकविले जात होते. मद्रास उच्च न्यायालयाने  वैद्यकीय आल्यासक्रमातील समलिंगी, ट्रान्सजेंडर यांच्या समस्यांसंदर्भात एक समिती समिती स्थापन करण्यास सांगितले होते. वैद्यकीय आयोगाच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा अरुणा वाणीकर यांनी तज्ञ समितीची स्थापन केली होती. 


या समितीत दिल्लीचे डाॅ. विरेंद्र कुमार, बंगलोरच्या डाॅ प्रभा चंद्रा,एम्स गोरखपुरच्या सुरेखा किशोर आणि सेवाग्रामचे न्यायवैद्यकशास्त्रतज्ञ  डाॅ इंद्रजीत खांडेकर हे सहभागी होते. डाॅ इंद्रजीत खांडेकर यांच्या विनंतीवरून कौमार्य विषय सुद्धा समितीच्या कार्यकक्षेत टाकण्यात आला. तेंव्हा कौमार्य चाचणी अवैज्ञानिक असल्याचा निर्णय या समितीने घेतला. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रथमच हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. वैद्यकीय आल्यासक्रमात विद्यार्थ्यांना याबाबत सकारात्मक शिकविले जाणार आहे.


बरीच भारतीय न्यायालये ही कौमार्य चाचणी अवैज्ञानिक आहे याबद्दल अनभिज्ञ असतात. त्यामुळे न्यायालयाने जर एखादी कौमार्य चाचणी करण्याचे आदेश डाॅक्टरांना दिल्यास ती कशी अवैज्ञानिक आहे, हे समजुन सांगण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण होणार आहे. न्यायवैद्यकशास्त्रातील ही अशी पहिलीच वेळ आहे.


मुळात एखादी स्त्री कुमारी  आहे अथवा नाही, हे जाणुन घेण्याचा अधिकार कुणालाच नाही. जात पंचायत मार्फत चालणाऱ्या कौमार्य चाचणी विरोधात लढत आहे. वैद्यकीय शास्त्रातील कौमार्य चाचणीच्या उल्लेखामुळे लढ्याला मजबुती येत नव्हती. पण या निर्णयामुळे लढा मजबुत होईल, असा आशावाद आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे अंनिस स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे.


मागील वर्षीची नाशिकची घटना 
दरम्यान मागील वर्षी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे कौमार्य चाचणीचा डाव अंनिस उधळला होता. त्यावेळी देखील नवरा मुलगा उच्च पदावर कार्यरत असताना लग्नानंतर त्याने मुलीची कौमार्य चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अंनिसला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नवा मुलाच्या कुटुंबीयांचा हा डाव उधळला होता.