Nashik Asaduddin Owaisi : युतीतून बाहेर पडण्याचा सर्वस्वी निर्णय प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) असून आम्ही बाळासाहेबांचा आजही, उद्याही आदर करतो. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. मात्र आता युती तुटली, यावर काय बोलू शकतो. आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे, आता कसं सांगू? या शब्दांत एमआयएम (MIM) आणि वंचितची युती का तुटली या प्रश्नाचे उत्तर असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रश्नांर्थक स्वरूपात दिले आहे. 


नाशिक (Nashik) दौऱ्यावर असदुद्दीन ओवेसी यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला (Vanchit bahujan Aaghadi) तडा का गेला याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले कि शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होण्याचे निश्चित आहे. शिवसेना ठाकरे युतीचा सर्वस्वी निर्णय प्रकाश आंबेडकरांचा निर्णय असून आम्ही बाळासाहेबांचा आजही, उद्याही आदर करतो. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. मात्र आता युती तुटली, यावर काय बोलू शकतो. आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे, आता कसं सांगू?  आम्ही आज पण बाळासाहेब आंबेडकरांचा आदरच करतो, त्यांनी कोणासोबत युती करावी हा त्यांचा निर्णय असल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले. 


ते पुढे म्हणाले, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी युती गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. त्यावेळी तळागळतील घटकांसाठी आम्ही एकत्र आलो. लोकसभा निवडणूक लढवली. उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातील जनतेला नवा पर्याय दिला. म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने (MIM) युती केली. मात्र आता एकत्र नाही आहोत, प्रकाश आंबेडकर आता शिसवेना ठाकरे गटाशी युती करत आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यावेळी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांचा होता. त्यांच्या या निर्णयाचा कालही आदर करत होतो. आजही करतो अन् पुढेही करत राहील. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. पण आंबेडकर या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर मी काय बोलू शकतो? आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे. आता कसं सांगू? योग्य वेळी त्यावर बोलेल, असं असदुद्दीन ओवैसी म्हणालेत.


लव्ह जिहादवर ते म्हणाले.... 
लव्ह जिहाद कायद्याविषयी सरकारवर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणाले कि, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आपला देश संविधानावर चालतो आहे. त्यामुळे संविधानानुसार कोणीही आपल्या आवडीनुसार विवाह करू शकतात, फिरू शकतात. मात्र भाजपची सत्ता ज्या ज्या राज्यात आहे, त्या ठिकाणी लव्ह जिहाद चा काय बनवला जात आहे. मात्र जे कोणी लव्ह जिहाद म्हणत आहेत असे किती लोक भाजपमध्ये आहेत त्यांनी अशी लग्ने केली आहेत. मग तेव्हा कायदा कसा अवलंबनार ? असा सवाल करत हा कायदा बेकायदेशीर असल्याचे ओवेसी म्हणाले. संविधानानुसार विवाह करण्याची परवानगी देखील संविधान देत, मग कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय? प्रत्येक प्रश्नाला जातीयवादाचे रूप दिले जात आहे. ज्यांना जे आवडतंय ते करूद्या. आपल्याकडे बेरोजगारी, महागाई आणि ईतर खूप मुद्दे आहेत, त्यावर भर देणे आवश्यक असल्याचे ओवेसी म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik Asaduddin Owaisi : कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय? प्रत्येक प्रश्नाला जातीयवाद, ओवेसी यांचा सरकारला सवाल