Nashik Padvidhar Election : नाशिकची पदवीधर मतदारसंघाची (Nashik Padvidhar Election) निवडणूक दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे. आता धनराज विसपुते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले असून विसपुते भाजपच्या पाठिंबासाठी फडणवीस यांच्या भेटीला गेल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात पुन्हा नवा ट्विस्ट पाहायला मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत पहिल्या दिवसांपासून पाहायला मिळत असून कालच अपक्ष उमेदवार तसेच धुळे (Dhule) येथील भाजपच्या कार्यकर्ते असलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्यानंतर या निवडणुकीत समीकरण बदलले आहे. तर तत्पूर्वी काँग्रेसचे (Congress) नेते पिता पुत्रांच्या खेळीमुळे या निवडणुकीत वेगळा ट्विस्ट पाहायला मिळाला. दरम्यान आता सत्यजित तांबे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून धनराज विसपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. धनराज विसपुते यांना यापूर्वीच भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र शेवटपर्यंत एबी फॉर्म न मिळाल्याने धनराज विसपुते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
दरम्यान दिवसेंदिवस नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठी घडामोडी घडत असल्याने नेमका कोणाला कोणाचा पाठिंबा याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. धनराज विसपुते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आता पाठिंबा द्यावा, यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांना साखळी घालणार आहेत. जर फडणवीस आणि विसपुते यांना पाठिंबा जाहीर केला तर नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांचा विजय लांबण्याची शक्यता आहे. एकीकडे शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने सत्यजित तांबे यांना विरुद्ध दर्शवला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजप पाठिंबा देणारच ...
नाशिक पदवीधर मतदारसंघातून भाजपाकडून इच्छुक असणारे धनराज विसपुते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाकडून शेवटपर्यंत एबी फॉर्म न मिळालं त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र पक्ष आपल्यालाच पाठिंबा देईल हा विश्वास सुद्धा धनराज विसपुते यांनी व्यक्त केला आहे. भाजपामध्ये तीस वर्षांपासून काम करत असून तब्बल 89 हजार पदवीधरांच्या नोंदणीही केलेल्या आहेत, त्यामुळे भाजपा मलाच पाठिंबा देईल हा ठाम विश्वास विसपुते यांनी व्यक्त केला. धनराज विसपुते म्हणाले कि, पाच जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 89 हजारच्या आसपास नोंदणी केली असून गेल्या तीस वर्षांपासून भाजपचे काम करतो आहे. त्यामुळे भाजप पक्षाचा पाठिंबा मिळणार, असं मला खात्रीपूर्वक वाटते असल्याचे ते म्हणाले.