Nashik Yeola Patangotsav : येवलेकरांचं (Yeola) पतंगाचं वेड जुनं असून पतंगोत्सवाची (Patangotsav) अनेक वर्षांपासून परंपरा आहे. त्यामुळे यंदा देखील मोठ्या उत्साहात पतंगबाजी केली जात आहे. भोगीच्या उगवत्या दिवसाबरोबर येवल्याच्या पतंगोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. दिवसभर शहरात डीजेच्या जोरदार आवाजात पतंगाला ढील येवलेकरांनी पतंगोत्सवाचे जल्लोषात स्वागत केले.
नाशिक (Nashik जिल्ह्यातील येवला शहरात पतंगोत्सवाची मोठी क्रेस आहे. येवल्यात पतंग बनविण्याबरोबर पतंग उडवण्याची (Makar Sankranti 2023) देखील एक वेगळीच कला इथल्या नागरिकांनी आत्मसात केली आहे, त्यामुळे पाहुणे, मित्र मंडळी देखील स्पेशली संक्रातीला पतंग उडविण्यासाठी येवला शहरात येतात. भोगी, संक्रात व कर हे तीन दिवस येवला शहराच्या पतंगोत्सवात महत्त्वाचे मानले जातात. येवला शहरातील गल्ली बोळ रिकामे आणि घराच्या गच्ची, बाल्कनीत फुल्ल गर्दी असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. मकर संक्रांतीच्या दिवसात पाहायला मिळते त्यात यंदा रविवारच्या सुट्टीसह सोमवारचा दिवस देखील येथे पतंगोत्सव रंगणार आहे.
घरातील सर्वच आबालवृद्ध यांच्यासह महिला तरुणीसह तीन दिवस पतंग उडवण्याचा आनंद लुटतात. अनेक महिला व तरुणही यात सहभागी होऊन पतंगबाजी करत असतात. त्याचबरोबर येवला शहरातील पतंगोत्सव राज्यभरात प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी मित्र आणि पाहुण्यांनाही पतंगोत्सवाचे निमंत्रण देण्यात येते. अहमदाबाद, सुरत पाठोपाठ येवला शहरात पतंगोत्सवाची अक्षरशः धूम पाहायला मिळते. भोगी मकर संक्रांतिसह कर हे तीन दिवस शहरातील रस्ते निर्मनुष्य होतात. बाजारपेठेही बंद राहते. तर कामाला सुट्टी देत तहानभूक विसरून येवलेकर पतंगोत्सवाचा आनंद लुटतात. आकाश रंगबेरंगी पतंगांनी गजबूजून गेलेले असते. आजी, आजोबा, आई, वडील, मुलगा सून अन् नातूही असे चार पिढ्यांचा पतंगोत्सवातील उत्स्फूर्त सहभाग यावेळी डोळ्यांचे पारणे फेडतो.
असा असतोय येवल्याचा पतंग -
येवल्यात पतंगबाजीबरोबर वेगळ्या धाटणीचे पतंगही तयार केले जातात.पतंग घ्यायचा तर आधींचा, पावणाचा, सव्वाचा किती 'फडकी'चा घ्यायचा, हे ठरविले जाते. फडकी म्हणजे पतंग तयार करण्याचा कागद. अर्धी फडकी म्हणजे सर्वांत लहान पतंग तयार करण्यासाठी लागणार्या कागदाचं प्रमाण. या फडकीचं प्रमाण वाढवाल तसा त्याचा आकार वाढत जातो. डट्टा म्हणजे पतंगाच्या मध्ये वापरण्यात येणारी काडी. कमान म्हणजे पतंगाच्यामध्ये वाकवलेली काडी. हे सगळं खळीच्या सहाय्यानं पतंगाला चिकटवले जाते. त्यांनतर शेपटी लावून पतंगाच्या डट्ट्याच्या दोन्ही बाजूंना दोन ठिपके काढून डोळे तयार होतात. अशा पद्धतीने हटके पतंग तयार केली जाते.
आरोग्यमंत्र्यांनी लुटला आनंद -
दरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी हजेरी लावून येवल्याच्या पतंग उत्सवाचा आनंद घेतला. भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडीया यांच्या घराच्या छतावर जाऊन त्यांनी समर्थक महिला पदाधिकाऱ्यांसह पतंगाला ढील देत पतंग उडवण्याचा आनंद लुटला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाचा पतंग नेहमीच उंच उंच भरारी घेत राहील असा आशावादही यावेळी व्यक्त केला