Vijayadashami Ravan : नाशिकमध्ये (Nashik) विजयादशमी (Vijayadashami) दसऱ्याचा उत्साह असून आज सायंकाळी रामकुंडावर (Ramkund) रावणाचे दहन करण्यात येणार आहे. चतु:संप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या (Balaji Temple) रावण दहनाच्या परंपरेचे यंदाचे 55 वे वर्ष असून यंदाचा विजयादशमी कार्यक्रम नाशिककरांसाठी आकर्षक ठरणार आहे. 


आज सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दसरा (Dasara) नाशिककर साजरा करत आहेत. दरम्यान गेल्या नऊ दिवसापासून शहरात गरबा दांडियाने (Dandia) चार चांद लावले आहेत. तर आज सायंकाळी रामकुंड परिसरात विजयादशमी निमित्ताने रावणाचे दहन करण्यात येणार आहे. यासाठी यंदा 60 फूट उंचीचा रावणाचा (Ravan) प्रतीकात्मक पुतळा उभारण्यात आला असून आज सायंकाळी रावण दहन करण्यात येणार आहे. आखाड्याचे तत्कालीन महंत दिन बंधुदास महाराजांनी 1967 साली रामकुंड परिसरात प्रथम रावण दहन सुरू केले. त्यानंतर ही परंपरा महंत कृष्णचरण दास महाराज यांनी पुढे सुरू ठेवली . 


दरम्यान गेली दोन वर्ष कोरोनामुळे (Corona) निर्बंध असल्याने ही परंपरा खंडित झाली. यंदा मोठ्या उत्साहात रावण दहनाची तयारी करण्यात आली असून मूर्तिकार सुनील मोदवाणी यांनी रावणाच्या दहा तोंडाचा 60 फूट उंचीचा प्रतीकात्मक पुतळा तयार केला आहे. बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला. त्यात श्री भगवान वेंकटेश बालाजी, भगवती श्रीदेवी व बहुदेवी यांची मिरवणूक देखील काढण्यात आली. श्री व्यंकटेश बालाजीचा विवाह सोहळा साजरा करण्यात आला. ग्रंथराज श्रीमद दासबोध सामुदायिक पारायण करण्यात आले. दसऱ्याला रावण अगोदर पंचवटी परिसरात वानर सेनेसह राम लक्ष्मण हनुमान रावण बिभीशन यांची वेशभूषा करून परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात येणार आहे . मिरवणूक नंतर रामकुंड परिसरात फटाक्यांची आकर्षक अध्यक्ष बाजी होणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळच्या सुमारास श्रावण दहन केले जाणार असल्याचे महंत कृष्ण चरणदास महाराज यांनी सांगितले. 


नाशिकमध्ये विविध ठिकाणी रावणदहन 
दृष्ट प्रवृत्तीचा विनाश, सत्याचा असत्यावर विजय मिळून आज सायंकाळी शहरातील विविध ठिकाणी रावण दहन केले जाणार आहे. दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा पुन्हा ही परंपरा सुरू होत असल्याने भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. पंचवटी परिसरातील चतु:संप्रदाय आखाड्यातर्फे रामकुंडावर साठ फूट उंच तर गांधीनगर येथील रामलीला मैदानावर 58 फुटी प्रतिकात्मक रावणाचे दहन केले जाणार आहे. आज विजयादशमी निमित्ताने ठिकठिकाणी प्रतिकात्मक रावण दहनाचे आयोजन करण्यात आले आहे. चतु:संप्रदाय आखाडा बालाजी मंदिरातर्फे सायंकाळी पाच वाजता रामकुंडावरील मनपाच्या वाहन तळावर रावण दहन करण्यात येणार असल्याची माहिती महंत कृष्णचरंदाचे दिली. 


गांधीनगरला 58 फुटी रावण 
प्रभू रामचंद्राने रावणावर विजय मिळवला तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून रामकुंडावर दरवर्षी रावण दहन केले जाते. यंदा हे 56 वे वर्ष असून नाशिक शहरात मोठा उत्साह आहेनाशिक शहरातील गांधीनगर परिसरात ऐतिहासिक रामलीला संपन्न होत असून आज मोठ्या उत्साहात विजयादशमी दसरा साजरा होत आहे. या निमित्ताने  रामलीला मैदानावर 58 फुटी प्रतिकात्मक रावणाचे दहन केले जाणार आहे. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक शाहीर हाडा,  कपिल शर्मा, दसरा समिती अध्यक्ष पप्पू कोहली, दिग्दर्शक हरीश परदेशी आदीं उपस्थित राहणार असून गांधीनगर येथील रावण दहनाची परंपरा 1954 पासून आज पर्यंत टिकून आहे.