Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात दांडिया दरम्यान डीजे ऑपरेटरचा (DJ Operator) शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर आता दुसरी धक्कादायक घटना समोर येत आहे. काँग्रेसच्या (Congress) माजी नगरसेवकाच्या नवरात्रोत्सव (Navratri) मंडळात राडा झाला असून यात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दसरा (Dasara) नाशिककर साजरा करत आहेत. दरम्यान गेल्या नऊ दिवसापासून शहरात गरबा दांडियाने (Garba) चार चांद लावले आहेत. मात्र नाशिकमध्ये काल रात्री घडलेल्या दोन घटनांनी दसरा सणाला गालबोट लावले आहे. पहिली घटना काल सायंकाळच्या सुमारास आडगाव परिसरात दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऐन उत्साहात दांडिया सुरू असतांना डीजे ऑपरेटरला विजेचा धक्का लागला. यात डीजे ऑपरेटरचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना अशी कि, दांडिया खेळताना धक्का लागल्याच्या कारणातून एकावर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरात गेल्या नऊ दिवसांपासून दांडिया गरबाचे आयोजन करण्यात आले होते. यात निर्बंधमुक्त सण साजरे होत असल्याने हजारो नाशिककर सहभागी होत होते. तर आज होणाऱ्या दसरा सणाचा देखील उत्साह ओसंडून वाहत आहे. अशातच काल रात्रीच्या सुमारास नाशिकच्या टाकळी परिसरात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने आयोजित केलेल्या दांडिया रासमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दांडिया खेळतांना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकावर टोळक्याकडून चाकुने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंहीर जखमी झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान कमल उर्फ बबलू लोट याचा मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या उपनगर परिसरात हि घटना घडली असून उपचारादरम्यान आज सकाळी कमल उर्फ बबलू लोट याचा मृत्यू झाला आहे. उपनगर परिसरातील माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक मंडळातील घटना आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून -चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तिघे अल्पवयीन असून संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र पुन्हा एकदा नाशिक शहरातील वाढत्या गुन्ह्यांनी डोकेदुखी वाढवली आहे. विशेष म्हणजे नाशिककरांच्या सुरक्षिततेवर टांगती तलवार आहे.
काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे सार्वजनिक नवरात्री मंडळ
नाशिकच्या उपनगर परिसरात हि घटना घडली असून येथील माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक मंडळातील घटना आहे. या ठिकाणी नवव्या दिवशी दांडिया रासचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र दांडिया सुरु असताना अचानक धक्का लागल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर संशयिताने कमल याच्यावर चाकू हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने कमल यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान कमल उर्फ बबलू लोट याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.