Dada Bhuse : लाखो शिवसैनिकांच्या कष्टावर त्यांच्या कामावर त्यांच्या रक्तावर शिवसेना (Shivsena) उभी राहिलेली आहे. शिवाय ठाणे (Thane) जिल्ह्यानंतर नाशिक (Nashik) जिल्ह्यांतून हजारो शिवसैनिक मुंबईला (Mumbai) रवाना झाले आहेत. त्यामुळे आज सायंकाळीच बीकेसी मैदानावर (BKC Ground) गर्दी पाहायला मिळणार असून बीकेसी मैदान कमी पडणार असल्याचे पालकमंत्री दादा भूसे (Minister Dada Bhuse) यांनी सांगितले 


दसरा मेळाव्यासाठी नाशिकमधून शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी श्री काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन मुंबईकडे प्रस्थान सुरू केले आहे. पंचवटीतील या मंदिरात आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तसेच खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह अन्य प्रमुख पदधिकाऱ्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले. 


मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा संपन्न होतो आहे. हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार धर्मवीर आनंद दिघे यांची कार्यपद्धती, शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विचारांचा सोनं लुटण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक मुंबईकडे रवाना होत आहेत आणि आपल्या त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने आनंदामध्ये वाजत गाजत मुंबईला आम्ही सगळेजण रवाना होत असल्याचे भुसे यांनी सांगितले.  


नाशिक म्हटलं की स्पर्शाने पवित्र झालेला आहे. आपला नाशिकचे वैभव असलेले हे काळाराम मंदिर. या मंदिरामध्ये दर्शन घेतले असून महाराष्ट्राची प्रगती होऊ दे. देशाच्या पातळीवर अग्रगण्य राज्य म्हणून आपण महाराष्ट्राच्या ठिकाणी होऊ देत. समाजातील सर्व घटक अगदी झोपडीतला शेवटचा जो आमचा माणूस आहे. त्याची प्रगती साध्य होऊ द्या अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी केली आहे. शेतकरी असेल कष्टकरी असेल समाजातील सर्व घटक यांना आशीर्वाद लाभावेत अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे. दररोजचे जे काही रुटीन व्यवहार दळणवळण असे ते पण चालू राहील. त्यासाठीचे नियोजन करण्यात आलेले असून कुठल्याही गोष्टीला गालबोट लागणार नाही, याचे पूर्ण नियोजन करण्यात आले. 


ठाणेनंतर नाशिकच्या शिवसैनिकांची गर्दी 
राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर शिवसैनिक असून भले तो झोपडीतला असेल रस्त्यावरचा असेल तो जनतेची सेवा करीत असतो. जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो त्याप्रमाणे त्याची कार्यपद्धती आहे. आणि अशा लाखो शिवसेनिकांच्या कष्टावर त्यांच्या कामावर त्यांच्या रक्तावर शिवसेना उभी राहिलेली आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यानंतर नाशिक जिल्ह्यांतून हजारो शिवसैनिक मुंबईला रवाना झाले असून त्यामुळे आज सायंकाळीच बीकेसी मैदानावर गर्दी पाहायला मिळणार आहे. तो प्रत्येक शिवसैनिक दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार ग्वाही मंत्री दादा भुसे यांनी दिली.