CM Eknath Shinde : नाशिकला (Nashik) मंदिराची भूमी म्हणून ओळखले जाते, शिवाय कुंभमेळ्याचे (Kumbhmela) आयोजनही करण्यात येते. नाशिक हे पवित्र तीर्थक्षेत्र आहेच, सोबत अनेक गड किल्ले आहेत. या माध्यमातून स्वराज्याच्या रक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून नाशिकचे महत्त्व होतं आणि म्हणून अशा ऐतिहासिक महत्त्व राखणाऱ्या नाशिकने गेल्या अनेक वर्षांमध्ये आपली मूळ जपत प्रगतीची उंच भरारी घेतलेली आहे. उद्योग, शेती, कला, साहित्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये नाशिकने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. विकासाच्या वाटेवर अग्रेसर असलेल्या नाशिकच्या या प्रगतीसाठी विकासासाठी राज्य शासन (State Government) देखील वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत आहे. 


नाशिक (Nashik) शहरात स्थानिक वृत्त वाहिनीने आयोजित केलेला नाशिक रत्न पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी राजकीय, सामाजिक शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे छत्रपती (SabhajiRaje Chatrapati)  यांनी सांगितलं कि, पर्यटनाला देखील चालना मिळाली पाहिजे, काही वेग मंदावलेला आहे, त्याला वेग मिळाला पाहिजे, गती मिळाली पाहिजे. आम्ही देखील तीन महिन्यापूर्वी बरंच मोठे पर्यटन करून आलो आणि त्यामुळे नक्कीच नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळेल. नाशिक देखील विकासाच्या माध्यमातून बदललेला आपल्याला पाहायला मिळेल. संभाजीराजांनी गडकिल्ल्यांचा विषय घेतला, संभाजीराजे छत्रपती रायगडाचे काम करतात.  आपल्या राज्यातलं हे गड किल्ले जे आहे ते आपली ऐतिहासिक संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात कसे गड किल्ले उभे केले असतील? हे गडकिल्ले जपण्याचे काम आपल्याला करायचं असून राज्य सरकार देखील प्राधान्य देणार आहे. यासाठी एक दुर्ग प्राधिकरण देखील राज्य सरकारच्या माध्यमातून उभे करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आमच्याकडे राज्यातील तरुण येतात, गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी काम करायला तयार आहोत, वेळ द्यायला तयार आहेत, या सर्व युवकांना मार्गदर्शनाची गरज असून याच्या माध्यमातून गड किल्ले जपले पाहिजेत. राज्यातील गडकिल्ले ही आपली संपत्ती असून गडकिल्ल्याच्या विकासाला राज्य सरकार प्राधान्य देईल. त्याचबरोबर मुंबई, पुणे या महानगरांचा थेट संबंध असून नाशिक देखील या शहरांसारखे विकसित होत आहे. त्यामुळे नाशिक पुणे शहराला जोडणाऱ्या नाशिक पुणे रेल्वेच्या प्रकल्पाला गती देण्याचे काम सुरु आहे. नाशिक पुणे अहमदनगर हा महत्वाचा मार्ग असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात असल्याचे ते म्हणाले. 


नाशिकच्या विकासाला प्राधान्य 
नाशिक शहर हे विकासाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून नाशिकच्या विकासाला सरकार प्राधान्याने पुढे नेईल. नाशिक महानगर, जिल्हा विकास आराखडा याबाबत पालकमंत्र्याशी चर्चा झाली असून स्वतः नगरविकास मंत्री होतो, तेव्हा सुद्धा नाशिकबाबत विशेष प्रकल्प दृष्टीपथात होते. नागरिकाना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्नशील असून येत्या काही दिवसांत आणखी उंचीवर घेऊन जाऊ, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 


सारथीच्या मध्यमातून तरूणांना दिशा
सारथीच्या माध्यमातून मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या तरुणांना दिशा मिळते आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे सारथीमुळे विविध स्पर्धा परिक्षांमधून ५० विद्यार्थ्यांची आज देशाच्या सेवेत वरिष्ठ अधिकारी पदांवर निवड झाली आहे.  सारथी च्या जडण-घडणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान व पाठबळ असून त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानतानी सारथी च्या योजना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी यावेळी केले.